नाशिक

द्वारकावर तीन महिने नो एन्ट्री!

खोदकामामुळे वाहतूक बंद; उद्यापासून अंमलबजावणी

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कल येथे भुयारी मार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुख्य उड्डाणपुलाखाली करण्यात येणार्‍या खोदकामामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सुधारित अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार द्वारका सर्कल येथे सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक तीन महिन्यांसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बंदी 19 एप्रिल 2026 पासून 18 जुलै 2026 पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत 24 तास सर्व प्रकारच्या वाहनांना द्वारका सर्कलमध्ये प्रवेश बंद असेल. द्वारका सर्कलवरील दोन्ही ‘अप’ आणि ‘डाउन’ रॅम्पदेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पुण्याच्या बसेस वडनेर गेटमार्गे
या काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पुणे रोडवरून मुंबईकडे जाणार्‍या हलक्या वाहनांना सिन्नर फाटा, बागूलनगर, विहितगाव सिग्नल, वडनेर रोडमार्गे वळविण्यात येणार आहे. पुण्याकडून त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या वाहनांसाठीही सिन्नर फाटा, पाथर्डी फाटा, अंबड गावमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबई नाका ते नाशिकरोड तसेच नाशिकरोड ते पंचवटी दरम्यानच्या वाहतुकीसाठीही स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून येणार्‍या हलक्या वाहनांना रासबिहारी चौक किंवा इंदिरानगर बोगदा येथे वळविण्यात येणार आहे.
सिटीलिंकच्या मार्गातही बदल
सिटीलिंक बससेवा तपोवन बस टर्मिनलवरून चालविण्यात येणार असून, शालिमार ते नाशिकरोेड आणि नाशिकरोड ते शालिमार या मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत. एसटी बससेवांसाठीही स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नाशिकरोड, मुंबई, सिन्नर आणि पुणे या दिशांना जाणार्‍या बससेवांना वेगवेगळ्या मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
धुळ्याच्या बसेस निमाणीतूनच
निमाणी बसस्थानकातून सुटणार्‍या एसटी बससाठीही नवीन मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. धुळे, मालेगाव, दिंडोरी, सटाणा, चांदवड आदी भागांकडे जाणार्‍या बससेवा नियोजित मार्गांद्वारेच चालविण्यात येतील.
अवजड वाहनांसाठी विशेष नियम लागू करण्यात आले असून, रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेतच त्यांना पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी शहरात विविध ठिकाणी डायव्हर्जन आणि बॅरिकेडिंग पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत.
नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पर्यायी मार्ग
1 : लाइट व्हेईकल (हलके वाहन)करिता येणारे-जाणारे मार्ग :
1) पुणे रोडकडून येणारे मुंबईकडे जाणारे हलके वाहन- सिन्नर फाटा- रेल्वे क्रॉसिंग- बागूलनगर-विहितगाव सिग्नल- वडनेर रोड- वडनेर गेट- पाथर्डीगाव सर्कल- पाथर्डी फाटा, गरवारेमार्गे मुंबईकडे जातील.
2) पुणे रोडकडून येणारे त्र्यंबकेश्वरकडे जाणारे हलके वाहन- सिन्नर फाटा-रेल्वे क्रॉसिंग- बागूलनगर- विहितगाव सिग्नल- वडनेर रोड- वडनेर गेट- पाथर्डी गाव सर्कल- पाथर्डी फाटा- अंबड गाव- एक्स्लो पॉइंटमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जातील.
3) मुंबई नाक्याकडून नाशिकरोडकडे जाणारे हलके वाहन- मुंबई नाका- गारवा बिर्याणी- भाभानगर- नागजी सिग्नल- काठे गल्ली सिग्नलमार्गे नाशिकरोड.
4) नाशिक रोडकडून पंचवटीकडे जाणारे हलके वाहन- फेम सिग्नल- मेट्रो मॉल जंक्शन- डावीकडे वळून ट्रॅक्टर हाउसमार्गे पंचवटीकडे जातील.
5) एनएच-3 वरून नाशिकमध्ये येणारी हलके वाहने ः
1) धुळ्याकडून येणारी हलकी वाहने रासबिहारी चौक येथे उतरतील. धुळ्याकडे जाणारे तेथूनच जातील.
2) मुंबईकडून येणारी हलकी वाहने इंदिरानगर बोगदा येथे खाली उतरतील व मुंबईकडे जाणारी तेथूनच जातील.
2. सिटीलिंक बसेसकरिता येणारे-जाणारे मार्ग :
सर्व सिटीलिंक बसेस या तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल येथून सुटणार आहेत.

No entry to Dwarka for three months!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 days ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 days ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 days ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

2 days ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

2 days ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

2 days ago