सुप्रीम कोर्टाकडून घरगृहिणींच्या कामाचे मूल्य 30,000 प्रतिमहिना निश्चित
नवी दिल्ली : प्रतिनिधी
महिलांच्या घरगुती कामाचा गौरव करत सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात म्हटले आहे की, महिलांना आता पारंपरिक ‘हाउसवाइफ’ (घरगृहिणी)ऐवजी ‘होममेकर’ आणि पर्यायाने ‘नेशन बिल्डर’ (राष्ट्रनिर्माता) संबोधले पाहिजे. मोटार अपघात नुकसानभरपाई दाव्यांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, गृहिणींच्या घरगुती सेवेचे किमान मूल्य 30,000 रुपये प्रतिमहिना इतके निश्चित केले आहे. एखाद्या गृहिणीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार्या नुकसानभरपाईत ‘घरगुती सेवेचे नुकसान’ हा एक स्वतंत्र आणि अतिरिक्त निकष मानला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने नोव्हेंबर 2001 मध्ये झालेल्या एका रस्ते अपघात प्रकरणात हा निकाल दिला. सिरसा ते फतेहाबाद प्रवासादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने सुरुवातीला तिला केवळ सामान्य मजूर मानून कुटुंबाला 2.42 लाख रुपये नुकसानभरपाई दिली होती, जी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 20 वर्षांनंतर 8.43 लाख रुपये केली होती. मात्र,
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निकाल देताना महिलेचे कुटुंबातील अमूल्य योगदान लक्षात घेऊन एकूण नुकसानभरपाई तब्बल 62 लाख 77 हजार 900 रुपये इतकी निश्चित केली.सर्वोच्च न्यायालयाने 2019 च्या ’टाईम युज सर्व्हे’चा दाखला देत स्पष्ट केले की, 15 ते 59 वर्षे वयोगटातील महिला दररोज 7 तासांपेक्षा जास्त वेळ घरगुती कामांसाठी देतात, तर पुरुष याच कामांसाठी 3 तासांपेक्षा कमी वेळ देतात. महिलांचे हे विनावेतन काम भारताच्या अर्थव्यवस्थेत 15 ते 17 टक्के योगदान देते, तरीही त्यांना योग्य आर्थिक मान्यता किंवा सन्मान मिळत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
संपूर्ण कुटुंबाची व्यवस्थाच गृहिणींवर अवलंबून
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने समाजातील गृहिणींच्या स्थानावर अत्यंत मार्मिक आणि महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. घरातील कमवत्या व्यक्तींंवर गृहिणी अवलंबून असते, असे म्हणणे उपरोधिक असून, उलट कमवते सदस्य आणि संपूर्ण कुटुंबाची व्यवस्थाच गृहिणींच्या मेहनतीवर आणि काळजीवर अवलंबून असते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. स्वयंपाक करणे, घराची साफसफाई, मुले व वृद्धांची काळजी घेणे यांसारख्या कामांमुळे इतर सदस्य त्यांच्या नोकरी-व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकतात, त्यामुळे गृहिणी या खर्या अर्थाने देशाच्या ’राष्ट्रनिर्माता’ आहेत.
No longer just a ‘housewife’, but a ‘nation-builder’!
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik