नाशिक

सावरगाव येथे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये चौघांचा बुडून मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
सावरगाव येथील धरणाच्या बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी घडली. या घटनेमुळे सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील धरणाच्या बॅकवॉटर परिसरात दुपारी सुमारे 4.10 वाजेच्या सुमारास काही युवक-युवती फिरण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र चौघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतांमध्ये गणेश सुरेश गोतरणे (वय 16), साहिल मनोहर गोतरणे (वय 16), निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय 16, सर्व रा. सावरगाव) तसेच मयुरी पवन जाधव (वय 21, रा. तळेगाव अंजनेरी) यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सावरगाव आणि तळेगाव अंजनेरीत शोककळा पसरली असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Four people drowned in the dam’s backwaters at Savargaon.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

16 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

16 hours ago