वेबसिरीजचा बटबटीतपणा नाटकात आणू नका – कुळकर्णी
नाशिक ः प्रतिनिधी
नाटक ही सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ही कला सांघिक कामगिरीवर अवलंबून असते, असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत कुलकर्णी यांनी अहमदनगर महाकरंडक 2022, उत्सव रंगभूमीचा – नवरसांची महाअंतिम फेरी स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात केले. एकांकिकांचे कौतुक केले तसेच स्पर्धेच्या उत्तम नियोजनाचे कौतुकही केले. वेब सिरीजचा प्रभाव बर्याच लेखक आणि दिग्दर्शकांवर जाणवला..मला आवर्जून सांगावसं वाटतंय वेब सिरीजच्या आहारी जाऊन बटबटीतपणा रंगभूमीवर आणू नका.. नाटक हे नाटकासारखंच व्हायला हवं, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.महिला लेखकांची संख्या वाढायला हवी, असं ही चंद्रकांत कुळकर्णी यांनी सांगितलं..
रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातील एकांकिका स्पर्धा महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित नुकतीच पार पडली.यावेळी नाट्यमल्हार प्रतिष्ठान, अहमदनगरच्या अऽऽऽय…!या एकांकिकेने प्रथम तर ऍबस्ट्रॅक्ट आर्ट, डोंबिवलीच्या हायब्रीड ह्या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या 1,11,000 उपविजेत्या संघाला 51,111 रुपये पारितोषिक मिळाले. अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद फिरोदिया, स्वप्नील जोशी, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता- दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी काम पाहीले.
दुर्गंधीयुक्त वातावरणात एसटी कर्मचारी करताहेत काम
नरेंद्र फिरोदिया आणि स्वप्नील जोशी यांच्या आगामी बहुभाषिक 1ओटीटी या प्लॅटफॉर्मवर येणार्या मकाम करी दाम या वेब सिरीजचा टिझर यावेळी लॉंच करण्यात आला. आगामी ओटीटी आणि महाकरंडकविषयी बोलताना सुपरस्टार स्वप्नील जोशी म्हणाले की, ही स्पर्धा आता वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. उत्कृष्ट आयोजन आणि भव्यता हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या एकांकिका या ठिकाणी बघता येतात. त्यामुळे ही एक पर्वणीचं आहे. आम्ही माध्यमातून नवोदित कलाकारांना नक्कीच संधी देऊ.
स्पर्धेत प्रथम आलेल्या अऽऽऽय…! या एकांकिकेचं दोन अंकी व्यावसायिक नाटकात रूपांतर करून त्याची त्यांच्या संस्थेतर्फे निर्मिती करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली..
पारितोषिक वितरण सोहळ्याचे सुत्रसंचलन प्रसाद बेडेकर आणि पुष्कर तांबोळी यांनी केले.घरोट, दोरखंड, जनावर, काली, जखणाई, सोडवणूक, कुस्ती, जो जे वांछील, बारस, बिली मारो सारख्या अनेक एकांकिकांनी यावेळी प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले..अनुष्का मोशन पिक्चर्स ऍण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी-मराठीच्या सहयोगाने झालेल्या या स्पर्धेत 120 एकांकिकांमधून 33 एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
हे ही वाचा :
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…