राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

न्यायपालिकेला कोणीही धमकावू शकत नाही

सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना फटकार

नवी दिल्ली : प्रतिनिधी
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत काढलेला मोर्चा त्यांना चांगलाच भोवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांना नोटीस बजावून त्यांच्या वर्तनावर स्पष्टीकरण मागितले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान अत्यंत कडक टिप्पणी केली. सूर्य कांत म्हणाले, की आम्ही उंच मनोर्‍यांमध्ये बसलेलो नाही. आम्हाला माहिती आहे की, बाहेर काय वक्तव्ये केली जातात आणि कोर्टात काय बोलले जाते. कोणीही न्यायपालिकेला धमकावू शकत नाही.
निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर)मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आणि मतदारांची नावे वगळल्याचा आरोप गेले काही दिवस विरोधक करत आहेत. याच मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या 13 नेत्यांनी 12 ऑक्टोबर रोजी चलो दिल्ली – मार्च फॉर डेमोक्रेसी काढला होता. हा मोर्चा थेट सुप्रीम कोर्टाच्या आवारापर्यंत पोहोचला होता, जिथे हजारो समर्थकांनी घोषणाबाजी केली आणि काहींनी पोलिसांच्या बॅरिकेड्स तोडून कोर्ट परिसरात प्रवेश केला होता. या मोर्चाविरोधातच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती, त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.

No one can threaten the judiciary; Supreme Court raps Rahul Gandhi

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

8 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

8 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

8 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

8 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

8 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago