आता बकऱ्या पण सुरक्षित नाही

मनमाडला दीड ते दोन लाख किंमतीच्या बकऱ्या चोरीला
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..?

मनमाड: प्रतिनिधी

शहरातील श्रावस्ती नगर भागातील भावेश सोनवणे यांच्या घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमधून सुमारे दीड ते दोन लाख रुपये किंमतीच्या सतरा अठरा बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी सुरवातीला येथे असलेल्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या त्यानंतर आपला मोर्चा गोठ्याकडे वळवला येथून सर्व बकऱ्या चोरी करून पोबारा केला आहे आयाधी देखील याच भागात असलेल्या मोकाट जनावरांना चोरट्यांनी लक्ष केले होते मात्र तेव्हाही चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते आता त्यांनी आपला मोर्चा बकऱ्याकडे वळवला आहे या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे..? जर शहरात येताना प्रत्येक वाहन तपासले जाते मग चोरटे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरे घेऊन जातातच कसे असा सवाल देखील या भागातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
मनमाड शहरातील श्रावस्ती नगर भागात राहणाऱ्या भावेश सोनवणे यांचा आपल्या घरामसोर पत्र्याचा गोठा आहे या गोठयात जवळपास 2 छोटे पिल्लं धरून 20 बकऱ्या होत्या काल रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान पिकअप गाडीतुन काही चोरटे आले आणि त्यांनी या भागात असणाऱ्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावून सरळ पिकअप गाडी गोठ्याजवळ लावली व राजरोसपणे सर्व बकऱ्या गाडीत घालून चोरून नेल्या बकऱ्याचा आवाज आल्याने सोनवणे कुटुंब जागे झाले त्यांनी बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला मात्र बाहेरून दरवाजा लॉक असल्याने त्यांना येता आले नाही त्यांनी घरांतूनच आरडाओरडा केला मात्र इतरांनाही बाहेर येता आले नाही कारण सर्वांचे दरवाजे बंद होते यानंतर भावेश सोनवणे यांनी मागील दरवाजा खोलून बाहेर आला व पिकअप गाडीचा पाठलाग केला मात्र चोरटे जोरात पळून गेले या भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत आहेत याबाबत मागेही पोलिसांना निवेदन दिले होते मात्र पोलिस देखील रात्रीची गस्त वाढवत नाही यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 शहरात गस्त वाढवावी
आमच्या श्रावस्ती नगर भागातील मोकाट जनावरे चोरून नेण्यात आली होती याशिवाय एक दोन घरफोड्या देखील करण्याचाप्रयत्न करण्यात आला होता तेंव्हाच आम्ही पोलिसांना या भागात गस्त वाढवावी म्हणून निवेदन दिले होते मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही आता पुन्हा चोऱ्या सुरू झाल्या आहेत यामुळे श्रावस्ती नगर शांती नगर या भागासह इतर भागात गस्त वाढवावी
अनिता इंगळे,जिल्हा सरचिटणीस भाजपा

Bhagwat Udavant

Recent Posts

दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जण ठार

  दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…

5 hours ago

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

2 days ago

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…

2 days ago

दहापट पैसे कमवायला गेली…खेळण्याचे पैसे घरी घेऊन आली

शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…

3 days ago

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला   शहापूर :  साजिद शेख एका…

4 days ago

आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…

4 days ago