ठाकरे बंधू, फडणवीस की शिंदे?
नाशिक : प्रतिनिधी
मनपा निवडणुकीच्या प्रचाराची काल (दि. 13) सांगता झाली. त्यामुळे आता नाशिककरांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने नाशिक मनपावर झेंडा फडकावण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला.
दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी कमी असल्याने यंदा राजकीय वातावरण नेहमीच्या निवडणुकीइतके तापले नाही. आठ वर्षांनंतर मनपा निवडणूक होणार असल्याने मनपाच्या निवडणुकीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ यंदा कमी कालावधी असल्याने पक्षांच्या सभादेखील कमी झाल्या.
दर निवडणुकीत नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर छोट्या- मोठ्या नेत्यांच्या सभा होतात. मात्र, यंदा गोल्फ मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे गट व मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ राज व उद्धव ठाकरे यांची सभा झाली. याच मैदानावर शिवसेना शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सभा झाली. भाजपा उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. तिन्ही नेत्यांच्या सभांना झालेली गर्दी आणि त्यांनी सभेत मांडलेले मुद्दे पाहता नाशिककर नेमका कोणाला कौल देणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंनी नाशिक व मुंबई शहरात सत्ता असताना केलेल्या कामांचा जयघोष केला, तर दत्तक नाशिककडे बाप फिरकलाच नाही, अशी टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत असताना नाशिकची आईसारखी सेवा करेन, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ गोदाघाटावर सभा घेतली. फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत नाशिककरांसमोर आकडेवारीचा खेळ मांडत विकासकामे करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय अनेक नेत्यांच्या छोट्या सभा पार पडल्या. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे हे दोन नेते तर मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि रणनीतीसाठी शहरात ठाण मांडून होते. शहरातील भाजपाच्या तीन आमदारांनीदेखील आपल्या समर्थकांसाठी प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे यंदाच्या मनपा निवडणुकीत कोणत्या नेत्याचा प्रभावी प्रचार झाला, कोणत्या पक्षाच्या पदरात मतदार आपला कौल देणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, यंदा प्रचाराला कमी कालावधी मिळाल्याने मोठ्या नेत्यांच्या मोजक्याच सभा होऊ शकल्या. विशेष म्हणजे, शहरातील सर्वच प्रमुख पक्षांचे महानगरप्रमुख, शहराध्यक्षच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांना आपल्याच प्रभागात अडकून पडावे लागले. त्यामुळे इतरांच्या प्रचारासाठी त्यांना जाता आले नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवारावरच प्रचाराची भिस्त असल्याचे चित्र होते.
Who will Nashik people vote for?
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…