आस्वाद

दुचाकी स्वप्नांची

– अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आधीच्या काळापासून दुचाकी म्हटली की हिरो होंडा नाव डोळ्यासमोर यायलाच हवं. इंस्टावर सध्या एक गाणं खूप गाजतंय स्प्लेंडर आणि रील वायरल होत आहे. प्रेम दुचाकी स्वप्न दुचाकी अशा अनेक उपमा या गाडीसोबत जोडल्या जातात तरुण पिढीसाठी आकर्षण असणारी ही दुचाकी केव्हा त्यांची स्वप्नसुंदरी होऊन जाते कळत नाही.
लवकरात लवकर कॉलेजला जायचं आणि गाडी चालवायची हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं त्यात प्रत्येक गाडी ही त्यांची स्वप्नातली सत्यता असते. 1994 मध्ये हिरो होंडा हिरो ग्रुप आणि जपानच्या होंडा संयुक्त उपक्रम यांच्या विद्यमाने ती जन्माला आली 2004 मध्ये विक्रीचे मोठे टप्पे सुद्धा तिने काढले आणि आस्था गळ्यात तरुण पिढीसाठी जी सगळ्यात मोठा आकर्षणाचा भाग असते ती म्हणजे स्प्लेंडर. प्रत्येकासाठी स्वप्न असणारी ही दुचाकी इतकी सहज काय आयुष्यात येत नाही बर का मी तर कितीतरी जणांच्या तोंडून ऐकले की पहिल्या पगारात घेतलेली दुचाकी म्हणजे आयुष्यभराची आठवण जबाबदारी. काही प्रेमाने लक्ष्मी राणी अनेक नाव देतात कारण ती खरी साथीदार प्रवासाची ती खरी साथीदार करिअरची आणि त्यामुळे आयुष्यात येणारी पहिली दुचाकी ही सगळ्यांसाठीच खूप खास असते नाही का. आपल्याला लहान पणी आई बाबा एकच शिकवायचे की खूप मोठे हो आणि आपल्या स्वतःच्या जीवावर एक दुचाकी घ्यावी तिला आयुष्यभर जपावं आणि तिने आपली आयुष्यभर साथ द्यावी आणि खरंच वाहन सांभाळलं तर ते आयुष्यभर नक्कीच साथ देत म्हणून तर तिच्या सोबतीला म्हटलेली गाणी सुद्धा आजतागायत मनात रेंगाळतात…
जिंदगी एक सफर है सुहाना
यहा कल क्या हो किसने जाना….

Of Two-Wheeled Dreams

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago