नाशिक

राजापूर घाटात कंटेनर-लक्झरीच्या धडकेत एकाचा मृत्यू, 22 जखमी

नगरसूल : प्रतिनिधी
येवला-नांदगाव राज्यमार्ग क्रमांक 25 वरील राजापूर घाटातील धोकादायक वळणावर मंगळवारी (दि. 13) सकाळी कंटेनर आणि लक्झरी बसमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
सकाळच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मिळताच राजापूरच्या पोलीसपाटलांसह स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मदतकार्याला गती मिळाली.
राजापूर घाटातील अरुंद रस्ता, अतिधोकादायक वळणे आणि सुरक्षा उपायांचा अभाव यांमुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. प्रत्येक अपघातानंतर केवळ मदतकार्य होते, मात्र या धोकादायक वळणांवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी या घाटाचे तातडीने सुरक्षा परीक्षण करून संरक्षक कठडे, दिशादर्शक व सावधानतेचे फलक लावावेत, तसेच वेगमर्यादा निश्चित करून रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

 

One dead, 22 injured in collision between container truck and luxury bus in Rajapur Ghat.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago