नाशिक

बोलठाण, न्यायडोंगरी उपबाजारांत मका लिलाव

सरासरी 2450 बाजारभाव; शेतकरी, व्यापार्‍यांचा सत्कार

नांदगाव : प्रतिनिधी
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोलठाण व न्यायडोंगरी उपबाजार आवारांत खरीप हंगामातील नवीन मका लिलावाचा शुभारंभ सभापती एकनाथ सदगीर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. बोलठाणला पहिल्याच दिवशी मक्याला प्रतिक्विंटल कमीत कमी 1901 रुपये, जास्तीत जास्त 2775 रुपये, तर सरासरी 2450 रुपये, तर न्यायडोंगरीत पहिल्याच दिवशी लिलावात मक्याला प्रतिक्विंटल कमीत कमी 2,180, जास्तीत जास्त 2,671 तर सरासरी 2,450 रुपये असा बाजारभाव मिळाला.
बोलठाणला जातेगाव येथील शेतकरी योगेश ढगे यांच्या मक्याला सर्वाधिक 2775 रुपये भाव मिळाला, तर न्यायडोंगरी येथे शेतकरी राहुल शंकर राठोड यांच्या मक्यास 2,606 इतका भाव मिळाला. बोलठाणला शेतमाल खरेदी करणारे व्यापारी मे. नहार ट्रेडिंग कंपनीचे संचालक
प्रीतेश सुभाषचंद्र नहार व शेतकरी ढगे यांचाही सत्कार करण्यात आला.
न्यायडोंगरीत मक्याची खरेदी करणारे व्यापारी मे. मित ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर राहुल कांतीलाल छाजेड, शेतकरी राठोड यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सभापती एकनाथ सदगीर यांनी उपस्थित माजी सभापती विलास आहेर आणि शिवसेना नेते किरण कांदे यांचा बाजार समितीच्या वतीने विशेष सत्कार केला. व्यापारी व शेतकरी वर्गाच्या वतीने संचालक दर्शन आहेर, सतीश बोरसे, जीवन गरुड, दीपक मोरे, नीलेश इपर, हिरालाल आव्हाड तसेच सचिव अमोल खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी न्यायडोंगरीचे माजी सरपंच नरेंद्र आहेर, विजय आहेर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुमतीलाल दुगड, जोएब तांबोळी, भरत अजमेरा, दत्तू शेवाळे, अंबादास वाघ, पोपट पवार, ज्ञानेश्वर कोर्‍हाळे, जालिंदर आहेर, गणेश आहेर, सुपडू साळुंके, साहेबराव आहेर, भावडू निस्ताने यांसह परिसर व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maize auction in Bolthan, Nyadongari sub-markets

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago