पोलिस महासंचालक सदानंद दाते : 583 उपनिरीक्षकांचा दीक्षान्त सोहळा
महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 127 चा दीक्षान्त संचलन सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अकादमीचे संचालक नवल बजाज यांच्या उपस्थितीत 420 पुरुष (गोवा राज्यातील एका प्रशिक्षणार्थीसह) आणि 163 महिला अशा एकूण 583 प्रशिक्षणार्थींनी 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलात प्रवेश केला. याप्रसंगी संचालक नवल बजाज यांनी प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ दिली. कार्यक्रमास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे आणि पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी उपस्थित होते.
यावेळी दाते म्हणाले की, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात पोलिस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आता तेथील नागरिकांच्या मनात सुरक्षेबरोबरच सेवेची भावना दृढ करण्याची गरज आहे. गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिस अधिकार्यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. अमली पदार्थांविरोधातील लढ्यात तरुण अधिकार्यांनी कठोर भूमिका घ्यावी, असे सांगतानाच त्यांनी कनिष्ठ कर्मचार्यांचे प्रसंगावधान आणि समस्या सोडविण्याची क्षमता ही अनेकदा पदापेक्षाही अधिक महत्त्वाची ठरते, असे नमूद केले.
पोलिस दलाची खरी ताकद जनतेचा पोलिसांवरील विश्वास आहे.नागरिक पोलिस ठाण्यात केवळ कायदेशीर मदतीसाठी नव्हे, तर न्याय आणि सुरक्षिततेच्या अपेक्षेने येतात. त्यामुळे प्रत्येक अधिकार्याने कायद्याचा रक्षक आणि समाजाचा संवेदनशील सेवक बनले पाहिजे. ‘प्रत्येक पोलिस हा गणवेशातील नागरिक असून, नागरिक हा गणवेश नसलेला पोलिस आहे’, ही भावना समाजात रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षान्त सोहळ्याच्या आयोजनासाठी सहसंचालक नंदकुमार ठाकूर, उपसंचालक (बाह्य वर्ग) प्रशांत खैरे, उपसंचालक (प्रशिक्षण) गीता चव्हाण, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण) महेश चिमटे आणि उपसंचालक (आयटी व सुरक्षा) पद्मजा चव्हाण-बढे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
पारितोषिक विजेते प्रशिक्षणार्थी
♦ ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी – उत्कर्षा जाधव
♦ द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी : मोहन पालमपल्ली
♦ कायदा विषयातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी : अमृता जाधव
♦ सर्वोत्कृष्ट नेमबाज : राजू जाधव
♦ सर्वोत्कृष्ट कवायत पुरस्कार : बळिराम बुडसे
♦ सर्वोत्कृष्ट अभ्यासासाठीचा ‘सिल्व्हर बॅटन’ पुरस्कार : वैशाली शेळके
One should work as a sensitive servant of society.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…