शहरात गणेशोत्सव आरास, देखावे पाहण्यासाठी गर्दी
येवला : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या स्थापनेनंतर येवला शहर आणि तालुक्यात गणेश मंडळांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेश मंडळांच्या आरासबरोबर विविध प्रकारचे देखावे बघण्यासाठी येवला शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. येवला तालुक्यातील तब्बल 38 गावांमध्ये यंदा एक गाव-एक गणपतीची स्थापना झाली.
या माध्यमातून विविध उपक्रमदेखील राबविले जात आहेत, तर येवला शहरात 90 मंडळांनी बाप्पाची स्थापना केली आहे.
गावात सामाजिक एकोपा, शांतता टिकविण्यासाठी तसेच गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात येऊन तालुक्यात 123 पैकी 37 गावांनी एक गाव-एक गणपती उपक्रम राबविला आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. गावे तंटामुक्त होऊन गावात उत्सवात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने एक गाव-एक गणपती ही संकल्पना गेल्या 8-10 वर्षांपासून सुरू केली आहे
गावागावांत एकोपा निर्माण करण्याच्या कामाला चांगलीच गती मिळाली. ग्रामस्थांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने येवला शहराबरोबरच ग्रामीण भागात महिला व मुलांसाठी रोज विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रंगत आहेत. दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण, आरोग्य अशा विविध विषयांची जनजागृती होत आहे. बालभोजन, कीर्तनाचे कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन होत आहे. इतर खर्चाला फाटा देत बालभोजनावर केला जात असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकीसह एकोपादेखील जपण्याचे काम विविध मंडळांतून होत आहे.
225 मंडळांकडून बाप्पाची स्थापना
यंदा शहर हद्दीत 90, तर तालुका पोलीस हद्दीत 49 अशा 150 च्या आसपास मंडळांनी बाप्पाची स्थापना केली. यात येवला शहर पोलीस ठाणे हद्दीतील 19, तर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील 18 गावांमध्ये यंदा एक गाव-एक गणपतीची स्थापना केली आहे. शहर पोलीस ठाणेंंतर्गत यंदा मोठे 16 व लहान 55 मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी
यांनी दिली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…