सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादासाहेब गायकवाड सभागृहाजवळ, नंदिनी नदीच्या काठावर निष्काळजीपणे टाकण्यात आलेल्या जिलेटिनसदृश पदार्थाच्या प्रकाराचा उलगडा मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ 24 तासांत केला आहे.
31 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी नदीच्या काठावर स्फोटक पदार्थ टाकण्यात आल्याचे समजताच, गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी जिलेटिनसदृश पदार्थ आढळून आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी बॉम्बशोधक व नाशक पथकास घटनास्थळी बोलावले. तपासात संबंधित पदार्थामध्ये अमोनियम नायट्रेट असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्फोटक पदार्थ मिळून आल्याने वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले व तपासाला गती देण्यात आली. सीसीटीव्ही
फुटेज उपलब्ध नसतानाही तपास पथकाने कौशल्याने आजूबाजूच्या मार्गांवरील फुटेज तपासून एक छोटा हत्ती वाहन संशयास्पद आढळले. पुढील तपासात वाहनचालक रिहान शेख यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार याच्या सांगण्यावरून नदीकाठी जिलेटिन कांड्यांची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले. त्यानंतर जाकीर अत्तार व त्याचे कामगार दबीर अन्सारी यांनी 3 हजारांहून अधिक जिलेटिन कांड्या नदीकाठी टाकल्याचे उघड झाले. भंगार माल खरेदी करताना अत्तार यास कंपनीकडून भंगारात मिळालेल्या वाहनाच्या बॉडीत स्फोटके सापडली. सदर बॉडी कंपनीकडून विकत घेतली गेली होती.
सखोल चौकशीत ही स्फोटके समृद्धी महामार्गावर दगड फोडण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात आतापर्यंत कुठल्याही घातपाताचा संबंध नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, स्फोटक पदार्थ हाताळताना व विल्हेवाट लावताना निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे. कामगार दबीर अन्सारी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणिक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, सपोनि जितेंद्र वाघ, पोउनि समद बेग आणि त्यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…