नाशिक

कांद्याचे दर घसरले; शेतकरी चिंताग्रस्त

लासलगावला गेल्या आठवड्याच्या तुलनेत 775 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर
आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे कांदा बियाणे कंपन्यांनी बियाणे उत्पादित करण्यासाठी लागणार्‍या कांद्याची खरेदी थांबवल्याने त्याचा परिणामदेखील दर घसरणीवर झाला आहे, तसेच बांगलादेशसह इतर देशांत कमी प्रमाणात होत असलेली कांद्याची निर्यात याचाही परिणाम कांद्याच्या दर घसरणीवर झाला आहे.
गेल्या आठवड्यातील मंगळवारच्या (दि. 16) तुलनेत लाल कांद्याच्या सरासरी दरात 775 रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या सरासरी दरातदेखील 1099 रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकट्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी लाल कांद्याची अंदाजे 20 हजार क्विंटल आवक झाली.
बाजारभाव कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 2800 रुपये तर सरासरी 1725 रुपये असे होते. तर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव कमीत कमी 900 रुपये, जास्तीत जास्त 1612 रुपये, तर सरासरी 1151 रुपये असे होते. येणार्‍या काही दिवसांत आवक कायम वाढत राहिल्यास दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तविली जाते.

सध्या लाल कांद्याला अपेक्षित असे दर मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे शेतकर्‍यांना लागवडीचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. काढणीनंतर जेव्हा कांदा विक्रीसाठी बाजारात येतो, तेव्हा अनेक वेळा बाजारभावात खूप घसरण होते. सरकारच्या निर्यातीतील अनिश्चित धोरणांचादेखील फटका बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.
– सुनील गवळी, कांदा उत्पादक, ब्राह्मणगाव (विंचूर)

कांदा बियाणे कंपनीचा खरेदीचा कोठा बहुतेक पूर्ण झाला असल्याने त्यांनी बियाण्यांसाठी लागणार्‍या कांद्याची खरेदी थांबवली आहे तसेच बांगलादेशात कांद्याची निर्यातदेखील कमी प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्यांमुळे इतर ख्रिस्ती देशातून कांद्याच्या मागणीत झालेली घट व सर्वांत महत्त्वाचे देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक, या चारही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून लाल कांद्याच्या दरातील घसरणीवर होत आहे.
– मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव

Onion prices fall; farmers worried
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago