नाशिक

ब्रिटिशकालीन दारणा धरणाची सुरक्षा रामभरोसेच

उपाययोजना न केल्यास वंचित आघाडीतर्फे आंदोलन

अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
ब्रिटिश राजवटीतील महत्त्वाचे धरण म्हणून दारणा धरण प्रसिद्ध आहे. सन 1912 मध्ये धरण तयार झाले असून, हे एक ऐतिहासिक धरण आहे. अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवणार्‍या धरणांची जोपासना व व्यवस्थापन अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे योग्य प्रकारे होत नाही. यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तथा नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेचे माजी चेअरमन दादाभाऊ शिरसाठ यांनी दिला.

दारणा धरणाचे 52 गेट, सहा गेट व पावर हाउस परिसरात धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणावर कोणत्याही प्रकारचे मेंटेनन्स व सुशोभीकरण केलेले दिसत नाही. धरणावर झाडेझुडपे वाढली असून, ते तोडण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. धरणावरील शाखाधिकारी मुख्यालयी थांबत नसल्याचा व धरणावर येत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. धरणाच्या विकासासाठी शासन निधी खर्च देते. मात्र, धरणाच्या गेटची परिस्थिती बघता कुठेच काही देखभाल-दुरुस्ती केलेली दिसत नाही. यावर्षी रंगकाम, ऑइलिंग, ग्रीसिंग व गेटवरील दोरांना काहीतरी काळे केमिकल लावले, हे काहीच केलेले दिसत नाही. निधीचा वापर कुठे व कसा केला? हा चिंतेचा विषय आहे. वरिष्ठ अधिकारी तपासणी किंवा पाहणी करत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून धरणावर काहीही काम केलेले नाही, धरणावर पथदीपही बसवले नाहीत.
धरणावर लेबर, चौकीदार, कामगार, गेज कारकून, मिस्त्री व ज्युनिअर इंजिनिअर असे एकूण 35 ते 40 कर्मचारी कार्यरत असायचे. परंतु, आता येथे कर्मचार्‍यांची वानवा दिसत आहे. शाखाधिकारी कोण आहेत, हे कोणालाच माहीत नाही. यामुळे एवढ्या मोठ्या धरणाची सुरक्षा रामभरोसे दिसत आहे. पूरपाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी, धरणाची सुरक्षा राखण्यासाठी 10 ते 22 कर्मचारी धरणावर राहणे अपेक्षित आहे.
धरणाच्या निर्मितीच्या वेळी साकूर गावाच्या बाजूला ब्रिटिशांनी उत्कृष्ट अशा विश्रामगृहांची निर्मिती केली. मात्र, त्याचीही दुरवस्था झाली असून, ती भूतबंगला झाल्याचे दिसते. त्यावेळी विश्रामगृहात कर्मचारी काम करत होते. या विश्रामगृहात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1935 मध्ये तीन दिवस वस्तीला राहून गेले आहेत, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. विश्रामगृहात एकही कर्मचारी अस्तित्वात नसल्याचे दिसते. विश्रामगृहाची पडझड झालेली असून, त्याची दुरुस्ती गरजेची आहे.

 

 

 

 

The security of the British-era Darna Dam is solely dependent on Rambharose

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago