उघडे चेंबर तरीही जिवावर उदार! सेल्फीसाठी जीव धोक्यात

नाशिक : अश्‍विनी पांडे
शहरासह जिल्ह्यात काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे गोदावरी नदी खळखळून वाहत आहे. गोदावरीचा पूर ओसरला असला तरी खळखळून वाहणारी गोदावरी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. मात्र गोदाघाटावर असलेले खड्डे थेट नदीपात्राशी जोडलेले असल्याने नजरचुकीने जर कोणी खड्ड्यात पडले तर मोठा अपघात होऊ शकतो.
गोदाघाटावर असलेले अनेक चेंबर फुटले आहेत. हे चेंबर थेट नदीपात्राशी जोडलेले असल्याने फुटलेले चेंबर मृत्यूला आमंत्रण देत आहेत. गोदाघाटावर कायमच पर्यटक तेथील व्यवसायिक आणि शहरातील नागरिकांची गर्दी होत असते. गोदावरीचा पुर पाहण्यासाठी आलेले नागरिक सेल्फी काढण्यात मग्न असतात. त्यावेळी त्यांचे उघड्या चेंबरकडे दुर्लक्ष होते. तसेच अंधार पडल्यावरही हे चेंबर दिसत नाहीत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
गोदाघाटावरील अनेक चेंबर पाणी जाण्यासाठी उघडे ठेवण्यात आले आहेत. तर काही चेंबर्स फुटलेले असल्याने ते धोकादायक ठरत आहेत. मात्र या फुटलेल्या चेंबर्सकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांनीच दुर्घटना होऊ नये म्हणून फुटलेल्या चेंबरवर बॅरिकेट्स टाकले आहेत. रामकुंडावर शहरातलेच नाही तर देशभरातले भाविक येत असतात. अशा वेळी उघड्या चेंबरकडे मनपा प्रशासन दुर्घटना झाल्यानंतर लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळी पर्यटन जीवावर बेल्याच्या अनेक घटना घडत आहे.त्यात गोदावरी घाटावरही अद्याप कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी गोदा घाटावरचे खड्डे , उघडे चेंबर्स दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात..त्यासाठी उघडे चेंबर लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिक, गोदाघाटावरील व्यवसायिक करत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

16 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

16 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

17 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

17 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

17 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

17 hours ago