खेडलेझुंगे, कोळगावला तापमानामुळे फळबागा धोक्यात

डाळिंबबागांसाठी शेडनेटचा आधार

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद व सारोळेथडी परिसरातील फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे डाळिंब व पेरूच्या बागांतील कोवळ्या फळांना उन्हाचा चटका बसत असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च करून शेडनेटचे संरक्षण कवच उभारावे लागत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.
परिसरातील शेतकरी विविध प्रयोगशील शेती करत फळबागांकडे वळले आहेत. मागील हंगामात अनेक शेतकर्‍यांनी डाळिंब, पेरू आदी फळपिकांची लागवड करून चांगले उत्पादन घेतले. मात्र, यंदा ऐन फुलधारणा व फळधारणेच्या काळात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढलेली उष्णता यामुळे फळबागा संकटात सापडल्या आहेत. शासनाकडून फळबागांसाठी शेडनेट अथवा क्रॉप कव्हरवर कोणतेही विशेष अनुदान मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने क्रॉप कव्हरसाठी अनुदान योजना राबवावी, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे. तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या नुकसानीसाठी विमा काढण्याचे आवाहन केले जात असले तरी नुकसान झाल्यानंतरही विम्याची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी विमा योजनांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
निफाड तालुक्यात 24 ते 30 मेदरम्यान कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले गेले आहे. दुपारच्या वेळी वाहणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे बागांमधील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, 30 मे रोजी कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पुढील काही दिवसही उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने क्रॉप कव्हर किंवा शेडनेटसाठी अनुदान देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक आधार मिळेल. – श्रीराम घोटेकर, डाळिंब उत्पादक

अतिरिक्त खर्चाने शेतकरी चिंतेत

कडक उन्हामुळे फळांची त्वचा करपणे, फळे सडणे, झाडांची पाने गळणे आणि उत्पादनावर परिणाम होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शेतकरी संपूर्ण बागा पांढर्‍या शेडनेटने झाकत आहेत. बांबू उभारणे, तारा ओढणे व शेडनेट खरेदी करणे यासाठी मोठा खर्च करावा लागत असून, अनेक शेतकरी कर्ज काढून हा खर्च भागवत आहेत.

Orchards in Khedlejunge, Kolgaon at risk due to high temperatures

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago