ओझर येथे शॉक लागून मायलेकीचा करुण अंत

ओझर येथे शॉक लागून मायलेकीचा करुण अंत

जावई ,दोन मुले थोडक्यात बचावली

ओझर : विशेष प्रतिनिधी

येथील दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा शॉक लागून मृत्यू झाला।. पत्नी अन् मुलीला डोक्यावर असलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.घरावरच्या गच्चीतील पेरू तोडत असताना हातातील रॉड हा हाय टेन्शन वायरला लागल्याने मीना हनुमंत सोनवणे ,आकांक्षा राहुल रणशूर या मायलेकिंचा जागीच मृत्यू झाला.तर पती राहुल रणशूर व त्यांच्या दोन बालकांना शॉक मुळे लांब फेकल्याने ते बालंबाल बचावले. सदर घटना आज रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी धाव घेतली पण गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता.ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत  पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठवले आहे.पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago