महाराष्ट्र

ट्रॅफिक ‘ब्लॉक’मुळे शनिवारी पंचवटी रद्द; अन्य गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मध्य रेल्वेतर्फे अटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तसेच जुन्या पॅनेल विसर्जन करण्यासाठी शनिवार (दि.6) आणि रविवारी (दि.7) आसनगाव व थानसीट स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आली आहे. तर अन्य गाड्यांच्या वेळापत्रकात व मार्गात बदल करण्यात आला आहे.
शनिवारच्या रद्द गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) धुळे एक्स्प्रेस, धुळे सीएसटी, सीएसटी मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड सीएसटी.

शॉर्ट टर्मिनेट/प्रस्थान स्टेशन बदल
हजूर साहिब नांदेड सीएसटी एक्स्प्रेस 5 जूनला नांदेडहून सुटून मनमाडला शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. ती मुंबईला जाणार नाही.
हिंगोली डेक्कन सीएसटी जनशताब्दी एक्स्प्रेस 6 जूनला हिंगोली स्थानकावरून सुटून नाशिकरोड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. तेथून ती मुंबईला जाणार नाही. सीएसटी हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस 6 जूनला मुंबईऐवजी मनमाडहून सुटेल. ही गाडी मुंबई ते मनमाडदरम्यान रद्द राहील. सीएसटी हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस 6 जूनला सीएसटीऐवजी नाशिकरोडहून नियोजित वेळेनुसार सुटेल. मुंबई ते नाशिकरोडदरम्यान ती रद्द राहील.

डाउन दिशेतील पुन: निर्धारित गाड्या
सीएसटी हावडा मेल सीएसटीहून 7 जूनला 1.20 वाजता, सीएसटी हावडा मेल सीएसटीहून 7 जूनला 1.30 वाजता, सीएसटी अमृतसर एक्स्प्रेस 7 जूनला 2.00 वाजता सुटेल. सीएसटी गोरखपूर विशेष गाडी 7 जूनला 4.00 वाजता, सीएसटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस 7 जूनला 2.15 वाजता, सीएसटी-नागपूर विशेष गाडी 7 जूनला 2.30 वाजता सुटेल. मुंबई एलटीटी शालिमार एक्स्प्रेस 7 जूनला 1.20 वाजता, एलटीटी बनारस सुपरफास्ट एक्स्प्रेस 7 जूनला 1.45 वाजता, एलटीटी पाटलीपुत्र एक्स्प्रेस 7 जूनला 2.00 वाजता सुटेल. एलटीटी-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेस 7 जूनला 2.15 वाजता, एलटीटी गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्स्प्रेस 7 जूनला 2.30 वाजता सुटेल.

डाउन दिशेतील वळविलेल्या गाड्या
खालील गाड्या 6 जूनला कल्याण-कर्जत -पुणे-मनमाड मार्गे चालविण्यात येतील. एलटीटी -बलिया-कामायनी एक्स्प्रेस, दादर – गोरखपूर विशेष गाडी, पनवेल -गोरखपूर एक्स्प्रेस, सीएसटी- बल्लारशाह एक्स्प्रेस. तर दादर साईनगर शिर्डी एक्स्प्रेस 6 जूनला कल्याण- कर्जत – पुणे – साईनगर- शिर्डी मार्गे वळविण्यात येईल. सीएसटी – लिंगमपल्ली- देवगिरी एक्स्प्रेस 6 जूनला कल्याण- कर्जत – पुणे – दौंड – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.

अप दिशेतील 5 जूनच्या गाड्यांचे नियमन
बलिया-दादर विशेष गाडी कसारा येथे पावणेदोन तास, शालिमार एलटीटी एक्स्प्रेस इगतपुरी येथे 50 मिनिटे आणि हावडा-मुंबई मेल इगतपुरी येथे 20 मिनिटे, भाटनी-एलटीटी एक्स्प्रेस भुसावळ विभागात 10 नियंत्रित केली जाईल. गोरखपूर एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर एलटीटी कुशीनगर, जयनगर एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर सीएसटी या गाड्या भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केल्या जातील. नागपूर – मडगाव एक्स्प्रेस प्रवास 6 जूनला भुसावळ विभागात 30 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
प्रवाशांची सोय
नाशिकरोड आणि मनमाड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी गाड्यांमध्ये प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल. ज्यांना तिकीट रद्द करावयाचे असेल त्यांना विशेष आरक्षण खिडकीमार्फत तिकीट परतावा देण्यात येईल.

 

Panchavati cancelled on Saturday due to traffic ‘block’; Schedule of other trains changed

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago