नाशिक

उद्यान व मैदानातील बाकांवर चोरट्यांचा डल्ला

चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधील संत गाडगे महाराज उद्यान आणि पाटीलनगर मैदान परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेतर्फे बसविण्यात आलेले बेंचेस अवघ्या दोन दिवसांत चोरीस गेल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.
संत गाडगे महाराज उद्यान व पाटीलनगर मैदानात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी हे बेंचेस बसविण्यात आले होते. मात्र, ते चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी ही बाब तातडीने नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि नगरसेविका साधना मटाले यांच्या निदर्शनास आणून दिली.
यानंतर बडगुजर यांनी तातडीने दखल घेत मनपाचे सिडको विभागीय उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांच्याशी संपर्क साधला. परब यांनी अंबड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी महापालिका अधिकार्‍यांसह संत गाडगे महाराज उद्यान व पाटीलनगर मैदान परिसराची पाहणी केली.
सार्वजनिक मालमत्तेची चोरी ही गंभीर बाब असून, संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यात यावा, अशी मागणी बडगुजर
यांनी केली.
दरम्यान, चोरीचा तपास सुरू असून, संबंधित आरोपींना लवकरच शोधून काढले जाईल. तसेच भविष्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे तपास
अधिकार्‍यांनी सांगितले.

Gang of thieves on benches in parks and fields

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago