गोदाघाट परिसरातील पार्किंग जमीनदोस्त

मलवाहिकांच्या वाहिन्यांसाठी निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या मलवाहिका काढून त्या ठिकाणी नव्याने वाहिन्या टाकल्या जात आहेत. गोदाघाट परिसरातील गाडगे महाराज पुलाच्या बाजूला असलेली पार्किंग महापालिकेने जमीनदोस्त केली आहे. बुधवार व गुरुवारी (दि.26) दोन दिवस हे काम सुरू होते.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या आठ महिन्यांवर आला असून, महापालिकेला रस्ते, जलवाहिन्यांचे प्रकल्प आणि मलवाहिकांची कामे मार्गी लावण्याचे आव्हान आहे. शहरातील सहाही विभागांत पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मलवाहिका टाकल्या असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. तर पंचवटीसह पश्चिम विभागातील मलवाहिका सिंहस्थापूर्वी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गंगा टी हाउस जवळील मंगळग्रह मंदिराच्या बाजूला 2003 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी महापालिकेने पार्किंग बांधून ठेवली होती. परंतु, या पार्किंगचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता ही पार्किंग हटवण्याची मागणी केली जात होती. त्याबरोबरच ड्रेनेज विभागाला मलवाहिकांचे कामे करायची असल्याने त्यांनी ही पार्किंग पाडण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही पार्किंग हटवण्यात आली आहे. बांधकामाचे ढीग विल्होळी येथील प्रकल्पावर नेण्यात आले आहे.

Parking area in the Godaghat vicinity razed to the ground

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *