चोर्यांच्या घटनांत वाढ, सीसीटीव्ही बंद, आगारप्रमुखांचेही दुर्लक्ष
मनमाड ः प्रतिनिधी
मनमाड शहर मध्यवर्ती बसस्थानकाचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा तर नाहीच, मात्र येथील प्रवासी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. मनमाड बसस्थानकावर रोज पुरुषांचे पाकीट, महिलांचे मंगळसूत्र चोरी होते. चेन स्नॅचिंग, पैसे चोरीचे प्रकार घडतात. बसस्थानकातील सीसीटीव्ही बंद आहेत. यामुळे रोज खुलेआम चोरटे डल्ला मारताहेत. याबाबत आगारप्रमुख कोणतेही पाऊल उचलत नाही. मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांपैकी मनमाड जंक्शन हे एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. मनमाड शहरातून एसटीने शिर्डी, शनिशिंगणापूर, नस्तनपूर, सप्तशृंगगड, अमळनेर व त्र्यंबकेश्वरसह इतर धार्मिक स्थळी जाण्यासाठी भाविकांची रेलचेल असते. याशिवाय, या बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने कमी जागेत स्थानकाचे कामकाज सुरू आहे. यामुळे मोठी गर्दी होते. त्याचा फायदा चोरट्यांकडून घेतला जातो. दिवसाआड मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.
एका सत्तरवर्षीय महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला, तरी त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस व महिलेचे नातेवाईक, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी बसस्थानकात भेट दिली. मात्र, भोंगळ कारभार सुरू असून, येथे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. शिपाईदेखील उपलब्ध राहत नाही.
स्थानिकांच्या मदतीने चोरीच्या घटना?
मनमाड बसस्थानकावर रोज हजारो प्रवासी ये-जा करतात.
यात अनेक प्रवासी भाविक असतात. याशिवाय, अनेक
जण शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त रोज ये-जा करणारे
असतात. रोज बाहेरच्या किंवा ज्येेष्ठ प्रवाशांचे पैसे, दागिने चोरण्याचा
धडाका या चोरट्यांनी सुरू केला आहे. चोरटे बाहेरचे असले तरी
स्थानिकांच्या मदतीशिवाय ते या चोर्या करू शकत नाहीत, असेही
दबक्या आवाजात बोलले जाते. या चोर्यांना आळा बसेल का,
असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…
नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…