सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप
मनमाड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगारात प्रवाशांना देण्यात येणार्या वागणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सवलत पास काढण्यासाठी आलेल्या एका वृद्ध प्रवाशाला दिवसभर ताटकळत ठेवून, त्यांच्याकडून नियमापेक्षा जास्त पैसे उकळल्याचा आणि त्यांना अपमानित केल्याचा गंभीर आरोप एका तक्रार अर्जाद्वारे केला आहे. नांदगाव तालुक्यातील मोहेगाव येथील रहिवासी नामदेव कारभारी शिंदे यांनी याप्रकरणी मनमाडच्या आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
प्रवासी शिंदे 17 मेस सकाळी अकराच्या सुमारास एसटीचा सवलत पास काढण्यासाठी मनमाड आगारात गेले होते. मात्र, तिथल्या संबंधित कर्मचार्यांनी त्यांना सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 पर्यंत विनाकारण बसवून ठेवले. तक्रारदाराने अर्जात नमूद केल्यानुसार, सवलत पाससाठी अधिकृत शुल्क 200 रुपये असताना, तेथील व्यवस्थापन कर्मचार्यांनी त्यांच्याकडून 100 रुपये जादा म्हणजेच एकूण 300 रुपये घेतले. विशेष म्हणजे, जास्तीचे पैसे देऊनही त्यांना सायंकाळपर्यंत पास देण्यात आला नाही.
जेव्हा त्यांनी या दिरंगाईबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांना अत्यंत हीन दर्जाची आणि अपमानजनक वागणूक देण्यात आली. यावेळी संबंधित कर्मचार्यांनी ‘तुम्हाला ज्याच्याकडे तक्रार करायची आहे, त्यांच्याकडे करा. आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही. माझ्या नादी लागू नका,‘ अशा शब्दांत अरेरावी केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची होणारी ही पिळवणूक आणि कर्मचार्यांची मुजोरी आता चव्हाट्यावर आली आहे.
एकीकडे एसटी महामंडळ ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य मिरवत असताना, दुसरीकडे आगारात होणारा हा भ्रष्टाचार आणि उद्धटपणा प्रवाशांच्या संतापाचे कारण ठरत आहे. आगार व्यवस्थापक या तक्रारीची दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचार्यांवर काय कारवाई करतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पीडित प्रवाशाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
माझी काही वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे.त्यामुळे मला दर महिन्याला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. याशिवाय ज्येष्ठ नागरिक म्हणून मला सवलत पास हवा होता यासाठी मी गेलो. मात्र, तेथील मुजोर कर्मचार्यांनी वाईट वागणूक दिली. मला या कामचुकार आणि भ्रष्ट कर्मचार्यामुळे नेहमीच्या तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जाता आले नाही. आगारप्रमुखांनी संबंधितावर रीतसर कारवाई करावी व मला न्याय द्यावा.
– नामदेव कारभारी शिंदे, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक
Passengers blocked at Manmad ST depot
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
एकीकडे महाग झालेले शिक्षण, त्यातच शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि झालेला बट्ट्याबोळ, त्यात भर पडत आहे…
केंद्रशासित पुद्दुचेरीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सुवेंदू अधिकारी, आसाममध्ये भाजपाचेच…
बारागाव पिंप्री रोडवर दोन ट्रक पकडले; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार सिन्नर : प्रतिनिधी महाराष्ट्रात…