नाशिक

औषधी विक्रेता संघटनेचे बुधवारी व्यवहार बंद

आवश्यक औषधांचा साठा करून ठेवा

नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ 20 मे रोजी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवत शांतता व संयम राखावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सहआयुक्त (औषधे) नाशिक विभाग अ. तु. बर्डे यांनी केले आहे.
या बंदमुळे शहर व जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. तथापि, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती दक्षता घ्यावी.
औषध दुकानदारांना परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी सु. सा. देशमुख, सहाय्यक आयुक्त (औषधे) भ्रमणध्वनी 9850177853, चं. अ. मोरे, सहाय्यक आयुक्त (औषधे), म. वि. देशपांडे, सहाय्यक आयुक्त (औषधे) या अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

काळजी घेणे आवश्यक
रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध होणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे व आदेशांची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासन, सहआयुक्त बर्डे यांनी केले आहे.

Pharmaceutical Dealers Association closed for business on Wednesday

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago