नाशिक

नाशिक रोड स्टेशनवर पाकीटमार जेरबंद

शिलापूर : प्रतिनिधी
नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशाचे पाकीट लांबविणार्‍या दोन चोरट्यास रेल्वे पोलिसांनी अवघ्या सात तासांत जेरबंद करीत मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद विश्राम मांजरेकर (रा. नवी मुंबई) नाशिक ते मुंबई असा प्रवास करण्याकरिता कामयानी एक्सप्रेसच्या मागील जनरल डब्यात रेल्वे स्टेशन नाशिकरोड प्लॅटफॉर्म नंबर तीनवर मागील डब्यात चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या मागील खिशात ठेवलेले एक ब्राउन रंगाचे पाकीट, त्यातील रोख रक्कम 14 हजार रुपये, पॅन कार्ड, डिझेल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स असा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करताच प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांनी पोलिसांचे तपास पथक तयार करून त्यांना तपास करण्याबाबत सांगितले. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे मनीष कुमार यांना मदतीस घेऊन नाशिक रोड रेल्वे स्टेशन हद्दीत शोध घेतला असता गुप्त माहिती देणार्‍या खबर्‍यांकडून हनुमान मंदिराजवळ दोन जण भांडत असल्याचे सांगितले. ते तत्काळ तेथे दाखल होत त्यांना नाव विचारले असता, आमिन यासीन शेख (वय 34, रा. सील गमीन कॉलनी, सवेरा हॉटेल समोर. छत्रपती संभाजीनगर), शेख झाकीर उद्दीन शेख जाहीर-उद्दीन (वय 42, रा. इंदिरानगर, न्यू बाहिजापुरा गल्ली नंबर एक, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक ब्राउन रंगाचे पाकीट मिळाले.
त्यात प्रमोद मांजरेकर यांचे नावाचे पॅन कार्ड दिसले व त्यात रोख रक्कम 12 हजार रुपये व इतर कागदपत्रे मिळाली. त्यांना उर्वरित रक्कम विचारली असता मद्यपान व जेवणासाठी खर्च केल्याचे सांगितले व गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलीस उपनिरीक्षक संजय केदारी यांनी दोघांस ताब्यात घेत अटक करत बेड्या ठोकल्या.
ही कामगिरी विभागीय अधिकारी स्वाती भोर, संजय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, उपनिरीक्षक संजय केदारे, हवालदार शैलेंद्र पाटील, संदीप उगले, राज बच्छाव, रघुनाथ सानप, कॉन्स्टेबल सुभाष काळे, विशाल धांडे व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रतापसिंह, आरक्षक मनीष कुमार यांनी केली.

 

Gavkari Admin

Recent Posts

चांदवड शहरासह तालुक्यात बिबट्याचा वाढता संचार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून उपाययोजनांची गरज चांदवड : केशव कोतवाल चांदवड शहरासह तालुका सध्या बिबट्यांच्या…

4 minutes ago

कांद्याचे रेकॉर्डब्रेक उत्पादन, मात्र अपेक्षित भाव नाही

कांद्याच्या ढिगार्‍यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे स्वप्न चिरडले लासलगाव : वार्ताहर नाशिक जिल्ह्यातील 2024-25 या हंगामात…

12 minutes ago

इच्छुक उमेदवारांकडून संभाव्य गट-गणात साखर पेरणी

निफाड तालुक्यात नवीन गट व गण रचनेनुसार होणार आगामी निवडणुका निफाड : विशेष प्रतिनिधी न्यायालयाच्या…

16 minutes ago

दिंडोरीतील जखमी युवकाचा मृत्यू घातपाताचा संशय

दिंडोरीतील जखमी युवकाचा मृत्यू घातपाताचा संशय दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी शहरातील गांधीनगर येथील जखमी युवकाचा…

18 hours ago

साप्ताहिक राशीभविष्य

मेष : गुंतवणूक लाभदायी या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. गुरू…

21 hours ago

अखेर बडगुजर, घोलप, मुर्तडक भाजपात दाखल, मुंबईत प्रवेश सोहळा

नाशिक: प्रतिनिधी ठाकरे गटाने हकालपट्टी केल्यानंतर चर्चेत आलेले माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री…

21 hours ago