नाशिक

फडोळ मळा ते अंबड गाव रस्ता खड्डे बुजवले, पण अपघातांत वाढ

सिडको : विशेष प्रतिनिधी
उशिरा का होईना, महापालिकेने फडोळ मळा ते अंबड गाव दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खड्ड्यांमध्ये योग्य तंत्र न वापरता बारीक खडी टाकल्याने रस्ता अपघातमुक्त न होता अधिकच अपघातप्रवण झाला आहे.
या रस्त्यावर दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ झाली असून, मनपाच्या बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फडोळ मळा ते अंबड गाव दरम्यानचा परिसर नव्याने विकसित होत असून, याठिकाणी अनेक कंपन्यांचे कामगार, व्यावसायिक आणि उद्योजक वास्तव्यास आहेत. तरीही मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती. या खड्ड्यांविरोधात भारतीय जनता पक्षाचे चिटणीस शरद फडोळ, तानाजी फडोळ, उत्तम मटाले यांच्यासह ग्रामस्थांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. महापालिकेने अखेर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. मात्र, यामध्ये प्रथम दगड टाकून रोलर फिरवण्यात आला आणि त्यावर फक्त शिंपडल्यासारखे डांबर टाकून त्यावर बारीक खडी टाकण्यात आली. परिणामी हे द्रुतगती काम अपघातांचे कारण ठरू लागले. खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
स्थानिक नागरिकांनी यामागे महापालिकेतील अधिकार्‍यांचा आणि ठेकेदारांचा संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रस्त्याच्या प्रश्नांवर आता नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

सदरहू रस्ता हा नवीन करण्याची आमची मागणी होती. मात्र, महापालिकेने खड्डे बुजवायला सुरुवात केली. असे करत असताना खड्ड्यांमध्ये कच टाकून महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहे का? यावर तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– शरद फडोळ, चिटणीस, भाजप नाशिक

सदरहू ठिकाणी कचदेखील टाकण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने यावर डांबरीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच येथे डांबरीकरण करण्यात येईल.
– हेमचंद्र नांदुर्डीकर, उपअभियंता, बांधकाम विभाग, नवीन नाशिक

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago