नाशिक

जय बाबाजी भक्त परिवाराच्या 108 आश्रमांत वृक्षारोपण

ओझर आश्रमात 111 रोपांची लागवड

ओझर : वार्ताहर
निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या
प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने प्रतिवार्षिक वृक्षारोपण करण्यास प्रारंभ करण्यात आला. राज्यातील व राज्याबाहेरील विविध 108 आश्रमांत वृक्षारोपण करण्यास प्रारंभ झाला. ओझर येथील जनशांतीधाम आश्रम परिसरात 111 रोपांचे रोपण करण्यात आले.
देव, देश आणि धर्मासाठी अविरत कार्य करणार्‍या जय बाबाजी भक्त परिवाराने अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी
महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वेरूळ, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, काशी, ओझर, खलघाट, रत्नागिरी येथील नरवण या प्रमुख आश्रमांसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील 108 आश्रमांत दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षीदेखील भक्त परिवाराच्या 108 आश्रमांत फुले व फळे आदी रोपांची लागवड करण्यात येत आहे. भक्त परिवाराच्या वतीने तीन वर्षांपूर्वी देशभरातील विविध भागांत एकाच दिवशी पाच लाख रोपांची लागवड करण्याचा विक्रम केला होता.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे व या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे. झाडे लावा-झाडे जगवा ही संकल्पना घेऊन वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास जय बाबाजी भक्त परिवाराने घेतला आहे. अधिकाधिक रोपांची लागवड करून हरितसंपदा निर्माण करण्याचा जय बाबाजी भक्त परिवाराचा मनोदय आहे.

वृक्षसंवर्धनाचाही संकल्प
ओझर आश्रमातील देवभूमी जनशांतीधाम परिसरात अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत 111 रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षसंवर्धनाचा संकल्पदेखील करण्यात आला. यावेळी आश्रमीय संत रवींद्रानंद महाराज, शिवाशेठ सोनवणे, पत्रकार अमर आढाव, कैलास पाटील, संतोष अनवट, कृष्णा सोनवणे, सुदर्शन सागजकर, कार्तिक शेळके, शिवम होले, रवींद्र शेजवळ, संकेत पाटील, कमल मिश्रा, प्रदीप धोंडगे व सेवेकरी उपस्थित होते.

 

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago