नाशिक

जेलरोडला कोयता गँगची पोलिसांकडून धिंड

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड परिसरात जुन्या वादातून फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयितांवर उपनगर पोलिसांनी कठोर कारवाई करत कॅनॉल रोड व कैलासजी सोसायटी परिसरातून कोयता गँगची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रविवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून फळविक्रेता इम्तियाज इसरार खान (वय 27, रा. मगर चाळ, कॅनॉल रोड) यांच्यावर सात ते आठ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. संशयितांनी हातात शस्त्रेे घेऊन परिसरात दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
याप्रकरणी इम्तियाज खान यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही
फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे सोहेल पठाण, जुनेद सय्यद, यश वाबळे, अभिजीत साळवे, विनोद घुगे यांच्यासह आणखी दोन ते तीन साथीदारांना अल्पावधीत अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची कॅनॉल रोड व कैलासजी सोसायटी परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कडक इशारा दिला. या कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जेलरोड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अधिक प्रभावी गस्त व कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच कॅनॉल रोड परिसरात घरांवर दगड-फेक करणार्‍या संशयितांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी दिली.
याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणार्‍याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहनही त्यांनी केले.
या कारवाईवेळी पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, राहुल वाळके, नवनाथ पोरजे, महेश कचरे, मिलिंद बागूल आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Police crack down on Koyata gang at Jail Road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago