मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता मुंबईच्या वेशीवरच रोखले जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला तिसर्यांदा परवानगी नाकारली आहे. सलग दोन वेळा परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही जरांगे मुंबईकडे निघाले असून, दोन दिवसांपासून पाणी आणि उपचार न घेतल्याने प्रकृती खालावली आहे. मंगळवारी त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे राहिला.
मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा उत्साह असून, दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले आहेत. मुंबईतीलमानाचे गणपती तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, जरांगे यांच्या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने आंदोलनासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वीही दोन वेळा जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. आता तिसर्यांदा परवानगी नाकारण्यात आल्याने जरांगे यांचा ताफा मुंबईच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच रोखला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत अटी व शर्तींच्या अधीन राहून आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी दिली जाते. त्यामुळे परवानगीशिवाय आंदोलन करण्याचा किंवा वेगळ्या मार्गाने मुंबईत प्रवेश करून आंदोलन उभारण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे पोलीस गोटातून सांगितले जात आहे.
जरांगे मुंबईकडे रवाना
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत, मंगळवारी जालन्यातून मुंबईकडे कूच केली आहे. आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, या मागणीसाठी ते मुंबईत धडक देणार असून, गेल्या तीन वर्षांतील हे त्यांचे तब्बल 11 वे उपोषण ठरणार आहे. आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Police deny permission for Jarange’s agitation for the third time.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…