श्रमिकनगर भागात खून केलेल्या आठ जणांची पोलिसांनी काढली वरात

श्रमिकनगर   खून प्रकरणातील

आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

सातपूर : प्रतिनिधी

 

श्रमिक नगर भागात तीन दिवसांपूर्वी गाडी साईटला घेण्याच्या कारणावरून टोळक्याने चाकूने वार करून एका 23 वर्षाच्या युवकाचा खून केला होता. या खून प्रकरणातील आरोपींची आज सातपूर पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणात काही अल्पवयीन तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लागलीच अटक केली होती.

बागलाण तालुक्यातील असलेला हा युवक भाडे तत्वावर खोली घेऊन श्रमीकनगर येथे मित्रांसोबत राहत होता. कामावरून घरी परतत असतानाच गाडी नीट चालवता येत नाही का ?या कारणावरून त्याच्यावर वार केले होते. यात त्याचा हकनाक बळी गेला होता. आरोपींना पकडल्यानंतर नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी, यासाठी नागरिकांनी आरोपींची धिंड काढण्याची मागणी बैठका घेऊन सातपूर पोलिसांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आठ जणांची सातपूर पोलिसांनी श्रमिक नगर परिसरातून धिंड काढली. त्यांना पोलिसी प्रसाद देखील दिला. या वेळी दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पथकाचे डीबी पथक तसेच कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago