शिंगवे बहुला येथील भयाण वास्तव
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 7 मधील शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीत गेली 25 वर्षे केवळ शेडचा सांगाडा उभा आहे. वर पत्रे नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करताना मृतदेह व अंत्यसंस्कारासाठी आलेले नातेवाईक यांना अवहेलना सहन करावी लागत आहे.
ज्येष्ठ नागरिक तुकाराम गोपाळा पाळदे यांच्या अंत्यसंस्कारावेळी हीच दुरवस्था प्रकर्षाने दिसली. सकाळपासूनच संततधार असल्याने स्मशानभूमीतील लाकडे ओली झाली होती. शेड असूनही छताला पत्रे नसल्याने उपस्थितांना छत्रीचा आधार घेऊन उभे राहावे लागले. मृतदेहावर पाऊस पडत असताना विधी कसा करायचा, असा प्रश्न उपस्थितांच्या मनात निर्माण झाला होता.
स्मशानभूमीसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोजाड यांनी तीन
वर्षां पासून शासन दरबारी व कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सध्या फक्त दोनच स्मशानभूमी आहेत स्टेशनवाडी आणि शिंगवे बहुला या त्या दोन. स्मशानभूमीत सुविधा न मिळाल्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या स्मशानभूमीसंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला वारंवार निवेदन, तक्रार करूनदेखील याकडे डोळेझाक केली जात आहे. जनसुविधाअंतर्गत निधी उपलब्ध करून राज्य शासन व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती प्रस्ताव सादर करावा.
– प्रमोद मोजाड, नेते, शिवसेना उद्धव ठाकरे गट
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…