नाशिक : देवयानी सोनार
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नाही, तर कौशल्य हेच यशाचे खरे भांडवल आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, कौशल्य, प्रशिक्षण देणार्या संस्था उद्योजक आदी तज्ज्ञांनी शिक्षण घेताना केवळ पदवी नाही, तर कौशल्यआधारित अभ्यासक्रम, तंत्रज्ञान आदींवर भर दिला आहे. उद्याच्या रोजगारासाठी आजच कौशल्याची तयारी करायला हवी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
नाशिकमध्ये सध्या कोणत्या कौशल्यांना सर्वाधिक मागणी आहे?
सीएनसी, पीएलसी, स्काडा, औद्योगिक स्वयंचलन, इलेक्ट्रिशियन, एमआयजी/टीआयजी व रोबोट वेल्डिंग, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, रेफ्रिजरेशन, गुणवत्ता नियंत्रण, सीएडी/सीएएम, संगणक हार्डवेअर-नेटवर्किंग, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), लॉजिस्टिक्स, तसेच संवादकौशल्य, टीमवर्क आणि इंग्रजीचे ज्ञान यांना सर्वाधिक मागणी आहे.
डिजिटल साक्षरता, एमएस ऑफिस, एक्सेल, एआय साधने, इंग्रजी संवाद, डेटा विश्लेषण, सादरीकरण, आर्थिक साक्षरता, उद्योजकता, समस्या निराकरण, चिकित्सक विचार, वेळेचे व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा कौशल्ये आवश्यक आहेत.
प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी
उद्योगाभिमुख प्रशिक्षण घेतलेल्या 70 ते 90 टक्के उमेदवारांना रोजगार किंवा शिकाऊ उमेदवारी मिळते. राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (एनएसक्यूएफ) अंतर्गत स्वयंरोजगाराच्याही संधी उपलब्ध आहेत. एआय, स्वयंचलन, सीएनसी, इलेक्ट्रिक वाहन आणि सौर ऊर्जा क्षेत्रात मागणी जास्त आहे.
उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळण्यात अडचणी
प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, प्रात्यक्षिक कौशल्यांची कमतरता, नवीन तंत्रज्ञानाचे कमी ज्ञान, संवादकौशल्य व सॉफ्ट स्किल्सचा अभाव, अनुभवाची कमतरता, शिस्त आणि इंडस्ट्री 4.0 चे अपुरे ज्ञान या प्रमुख अडचणी आहेत.
महिलांसाठी कोणत्या संधी
संगणक ऑपरेटर, डेटा एन्ट्री, ग्राफिक डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, टॅली-जीएसटी, आरोग्य सहाय्यक, ब्यूटी अँड वेलनेस, फॅशन डिझाइन, इलेक्ट्रॉनिक्स, अन्नप्रक्रिया, ई-कॉमर्स आणि एआयआधारित डिजिटल सेवांमध्ये रोजगार, तसेच घरातून कामाच्या संधी वाढत आहेत.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय), राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (एनएपीएस), महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (एमएपीएस), मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरपीएल, एमएसआरएलएम, पीएमईजीपी, मुद्रा कर्ज योजना आणि कौशल्य विकास-उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत.
एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे रोजगारात काय बदल होत आहेत?
स्मार्ट उत्पादन वाढत असून, एआय ऑपरेटर, डेटा विश्लेषक, रोबोट तंत्रज्ञ यांसारखे नवीन रोजगार निर्माण होत आहेत. डिजिटल कौशल्ये, रीस्किलिंग आणि अपस्किलिंगचे महत्त्व वाढत आहे.
पुढील पाच वर्षांत कोणती कौशल्ये महत्त्वाची ठरतील?
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, स्वयंचलन, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, क्लाउड कॉम्प्युटिंग, आयओटी, थ्रीडी प्रिंटिंग, तसेच संवादकौशल्य, नेतृत्व, टीमवर्क, समस्या निराकरण, वेळेचे व्यवस्थापन, ग्राहकाभिमुखता आणि उद्योजकता यांना सर्वाधिक महत्त्व राहील.
कौशल्य हे केवळ नोकरी मिळवून देत नाही, तर ते उद्योजक बनण्याची आणि स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करण्याची ताकद देते. बदलत्या काळाशी जुळवून घेताना पारंपरिक शिक्षणासोबतच आजच्या तरुणांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) डिजिटल मार्केटिंग, कोडिंग व इतर हस्त कौशल्यावर प्रभुत्व मिळविणे गरजेचे आहे. – विजय रिसे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा रोजगार व कौशल्य विकास विभाग
ग्रामीण युवक-युवती आणि महिलांसाठीही विविध शासकीय योजनांद्वारे कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक तरुणाने दरवर्षी किमान एक नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करावा.
– दीपक बाविस्कर, प्राचार्य, संत मीराबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), नाशिक
नाशिकमध्ये सीएनसी, रोबोटिक्स, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, डिजिटल विपणन, लॉजिस्टिक्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा अशा क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधुनिक अभ्यासक्रम, ऑन-द-जॉब प्रशिक्षण आणि प्रगत कौशल्य अभ्यासक्रमांद्वारे ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा रोजगार दर 70 ते 80 टक्के आहे. अप्रेंटिसशिप पूर्ण करणार्यांना जवळपास शंभर टक्के रोजगाराच्या संधी मिळतात.
Preparing skills today for tomorrow’s employment.