आदिवासी दिनानिमित्त शहरात मिरवणूक

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी दिनानिमित्त काल शहरात मिरवणूक काढण्यात आली. पंचवटी, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालिमार या मार्गे काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत चित्ररथ सहभागी झाले होते.

बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांबरोबरच पुतळा सजविलेल्या रथात ठेवून डीजेच्या तालावर काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत दिंडोरी, नाशिक, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, शहरातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
यावेळी आदिवासी नृत्य तसेच वेशभूषा आणि लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आदिवासी बांधवांनी काढलेल्या मिरवणुकीत विविध प्रकारचे चित्ररथ सहभागी झाले होते. आदिवासी गीतांच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.

Procession in the city on the occasion of Tribal Day.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *