राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

‘नीट’ पेपर फोडणार्‍या प्राध्यापिकेला अटक

पेपरफुटी झालीच नसल्याचा ‘एनटीए’चा संसदीय समितीसमोर दावा

नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी
देशभरात खळबळ उडवून देणार्‍या ’नीट’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)े मोठी कारवाई केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)द्वारे परीक्षा प्रक्रियेत विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्त केलेल्या पुण्याच्या सेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या प्राध्यापिका मनीषा संजय हवालदार हिला सीबीआयने अटक केली आहे.
प्रा. हवालदार हिने तिला मिळालेल्या गोपनीय अधिकाराचा गैरवापर करत भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांची महत्त्वाची माहिती आणि प्रश्न फोडल्याचा गंभीर आरोप आहे. तिने हे प्रश्नआधीच अटक करण्यात आलेली सह-आरोपी मनीषा मांढरे हिच्याशी शेअर केले होते, जे नंतर विद्यार्थ्यांना विकण्यात आले. सीबीआयच्या तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपासणीत हे प्रश्न मुख्य परीक्षेशी तंतोतंत जुळले असून, या प्रकरणात आतापर्यंत देशातील विविध शहरांतून 11 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
एकीकडे सीबीआय तपासात नवनवे धागेदोरे समोर येत असताना, दुसरीकडे संसद भवनात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीसमोर एनटीए चे महासंचालक अभिषेक सिंग आणि उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी हजर झाले होते. या संसदीय चौकशी समितीच्या तीक्ष्ण प्रश्नांना तोंड देताना एनटीए ने आपल्या मुख्य यंत्रणेतून किंवा सिस्टीममधून कोणताही पेपर फुटला नसल्याचे सांगत थेट जबाबदारीतून हात झटकले. एजन्सीच्या अधिकार्‍यांनी समितीसमोर एक अजब युक्तिवाद केला की, देशात कोणतीही सरसकट पेपरफुटी झालेली नाही, तर केवळ काही विशिष्ट प्रश्नच केंद्राबाहेर आले होते.एनटीए च्या अजब दाव्यावर संसदीय समितीच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि अधिकार्‍यांना धारेवर धरले. जर मुख्य सिस्टीममधून पेपर लीक झालाच नव्हता, तर मग तब्बल 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ सरकारवर का आली? असा रोखठोक प्रश्न खासदारांनी उपस्थित केला. यावर सारवासारव करताना एनटीए प्रमुखांनी सांगितले की, प्रश्नपत्रिका पूर्णपणे लीक झाली नसली तरी काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आणि अनियमितता नक्कीच समोर आली होती. एजन्सीच्या ’झीरो-टॉलरन्स’ धोरणामुळे आणि विद्यार्थ्यांचा परीक्षा पद्धतीवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत कडक पाऊल म्हणून परीक्षा रद्द करून पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

एनटीए बळकट करणार : धर्मेंद्र प्रधान

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारची भूमिका मांडताना स्पष्ट केले की, परीक्षा माफियांना रोखण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारला कठीण निर्णय घ्यावे लागले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आता सीबीआयकडून केली जात असून, येत्या 21 जून रोजी ही नीट परीक्षा संपूर्ण देशभरात पुन्हा नव्याने आयोजित केली जाणार आहे. भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी एनटीए ही परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित (सीबीटी) करण्याच्या विचारात असून, रिक्त पदे भरून यंत्रणा अधिक बळकट करण्याची ग्वाही या समितीसमोर देण्यात आली आहे.

Professor arrested for tearing up NEET paper

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago