– राजेश शिरभाते
एकावेळेस कोणी आपल्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करतो, तर एखादा तरुण त्याचे एखादे गाणे इतके तुफान गाजते की, ते समाजातील सर्वच स्तरांत स्वीकारले जाते.
हा सारा विषय आठवण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाच्या शीर्ष नेत्या सोनिया गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर केलेला प्रवेश आणि लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद. त्यामुळे त्यांचा समाजातील प्रभावच अधिक दिसून आल्याचे मत सर्वच जण व्यक्त करत आहेत. काही जण मात्र या समाजमाध्यमांवर किंवा इतर अभिव्यक्तीच्या साधनांवर अंकुश कसा ठेवायचा याचा विचार करत आहेत. अभिव्यक्ती ही अभिव्यक्ती असते ती आपल्या बाजूने किंवा आपल्या विरोधात नसते. जर समाजातील मोठा गट आपल्याशी जोडला जात नाही. आपण जे काही म्हणतो त्याच्यावर जर विश्वास ठेवत नसेल तर त्याला कारणही आपणच असतो. आपल्या विचारात नावीन्य नसावे. आपली समाजातील प्रतिमा ही विश्वासार्ह नसावी. आपले बोलणे किंवा आपली भाषा योग्य नसावी असा त्याचा अर्थ होऊ शकतो. लोकांना आपला जो पूर्वीचा अनुभव असतो त्यानुसारही प्रचाराचा प्रभाव कमी जास्त होत असतो.
सोनिया गांधी यांनी समाजमाध्यमावर येऊनही जगातील सवार्ंत जुने माध्यम असलेल्या पुस्तकाचा प्रचार केला. त्यांच्या पुस्तकाविषयीची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सोनिया गांधी यांच्याकडे काही पक्ष ज्या पद्धतीने पाहत असतात किंवा अगदी मोठमोठे नेतेही त्यांचा ज्या अपमानास्पद पद्धतीने उल्लेख करतात, हे लोकांना आवडत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीविषयी विरोध जरी व्यक्त करायचा असला तरी त्याची भाषा संयमी ठेवावी लागते. लोकांना या पद्धतीची भाषा वापरायची सवय आहे. त्या विरोधातील किंवा त्या पेक्षा कमी दर्जाची भाषा मग ती कोणी जरी वापरली तरी लोकांना ती रुचत नाही. सोनिया गांधी यांचे कर्तृत्व त्यांचा त्याग, त्यांचे स्वतःकडे चालून आलेले पंतप्रधानपद नाकारणे आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीला देशाचा पंतप्रधान करण्याचे त्यांचे विचार हे सारे लोकांना भावलेले आहेत. हेही यातून दिसून येतात. त्याचबरोबर त्यांच्या मुलाचे व मुलीचे गेल्या काही वषार्ंतील लोकांशी समरसून जाणे. लोकांच्या प्रश्नांंसाठी आवाज उठवणे हेही कुठेतरी लोकांच्या मनात रुतून राहत असते. त्यामुळेच त्यांना पहिल्याच दिवशी अनेकांनी फॉलो केले. यामध्ये केवळ काँग्रेसचे कार्यकर्तेच नव्हते तर तरुणांचाही मोठा सहभाग होता. सध्याच्या काळात माध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यात फार मोठी दरी आहे. एकेकाळी एखादी बातमी सर्वच माध्यमांमधून प्रसारित होत होती. आताशा असे होत नाही. फार मोठी म्हणजे स्वतःला मोठी समजणारी माध्यमे चक्क खोट्या बातम्या प्रसारित करतात. गेल्या आठवड्यात एका वाहिनीने नेहा सिंग राठोड या लोकगीत गायिकेच्या विरोधात अत्यंत खालच्या दर्जाची व खोटी बातमी प्रसारित केली. स्वतःला फार मोठे पत्रकार समजणार्यांचीही लायकी त्यातून दिसून आली. इतकी की आहूजा नावाच्या एका माणसाला जेव्हा नेहाने फोन केला तेव्हा त्याला तिला नीट उत्तरही देता आले नाही. त्याने हे काम कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणत्या तरी अमिषानेच केले असावे हे अगदी निरक्षर माणसालाही सहज लक्षात येईल. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. देशाच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा विचार करता हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे. एका बाजूला हे केले जात असताना दुसरीकडे अगदी लहान लहान युट्यूब माध्यमेही मोठी काम करत आहेत. ते लोकांचे प्रश्न मांडत आहेत. लोकांच्या व्यथा मांडत आहेत. या देशातील शाळांची जी अत्यंत वाईट स्थिती आहे ती समोर आणण्याचे काम याच लहान लहान वाहिन्यांनी केले. त्यांच्या या कामाचे खरोखर कौतुक आहे. खरी पत्रकारिता ही अशाच प्रकारची निर्भय असते. त्यांच्याकडे उपकरणे नाहीत. त्यांच्याकडे गुतंवणूक नाही, पण त्यांच्याकडे काही चांगले काम करण्याची इच्छा आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया टाकण्याचे काम ही मंडळी करत असतात.
समाजाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आड येणारी ही संकुचित आणि केवळ लोकांच्या चोरीच्या पैशांवर जगणारी जमात कितीही आदळआपट करत असली तरी त्यांचा परिणाम होत नाही. त्यांना आपण विखारी प्रचार केल्याचे समाधान मिळत असेल मात्र, त्यांचा प्रभाव समाजात तशाच प्रकारचा असतो. एखादा गावगुंड रत्याने चालताना लोक रस्ता बदलतात ते त्याच्याविषयीच्या आदरामुळे नसते तर ही नसती ब्याद आपल्या मागे लागायला नको असा विचार असतो. या ट्रोलिंग करणार्या संघांकडे पाहण्याचा सुशिक्षित आणि देशप्रेमी जनतेच्या हा विचार आहे. त्यांना वाटते की, आपण लोकांना घाबरवले मात्र, लोकांनी मराठीतील म्हणीप्रमाणे तुम्हाला ओवाळून टाकलेले आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. समाजमाध्यमाची एक शक्ती असते. त्याचा एक प्रभाव असतो. त्याचे एक गंमतशीर उदाहरण सांगतो. दिल्लीत जंतरमंतरवर मोठे आंदोलन झाले व एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. यावेळी सरकारने खिळे लावलेल्या काठ्या आणून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. अनेक गैरप्रकार केले. या सार्या गदारोळातही एका गाण्यावर आपली मान वेगळ्याच पद्धतीने हलवणारा एक तरुण सर्वांच्या लक्षात राहिला. या जंतरमंतरवरच्या आंदोलनाकडे स्वतःला मोठ्या समजणार्या माध्यमांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर इथे केवळ शेदिडशेच लोक आल्याच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्या. त्यातही या सार्या आंदोलनाला परदेशी अर्थसहाय्य झाल्याच्या अफवा उडवल्या. या आंदोलनातील नेत्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न केले. शेवटी काय झाले. आपला घसरलेला टीआरपी परत मिळवण्यासाठी त्यांना याच तरुण नेत्यांना आपल्या वाहिनीवर बोलवावे लागले. त्यांच्यासमोर नाकदुर्या काढाव्या लागल्या. या वाहिन्यांना या मुलांनी आंदोलनापासून दूर ठेवले. त्यांच्या स्थानिक पत्रकारांचेही अपमान केले. इतकी स्थिती त्यांच्यासमोर निर्माण केली. मात्र, समाजमाध्यमाच्या प्रभावाने हे आंदोलन यशस्वी झाले. या समाजमाध्यमाचा वापर करुन देशातील लाखो देशप्रेमी लोकांनी आंदोलकानाही जेवण पाठले. त्यांची सेवा केली. या देशात कोणत्याही माध्यमांनी लोकांसमोर जाता येत केवळ आपला हेतू शुद्ध असला पाहिजे. महात्मा गांधींच्या आंदोलनाच्या वेळेस माध्यमे विकसित नव्हती, तरीही सारा देश गांधीजींच्या मागे उभा राहिला. आज इतक्या वर्षांनंतरही पुढची पिढी जेव्हा गांधीजींचे विचार घेऊन पुढे जाते तेव्हा प्रचाराचा किंवा प्रसाराचा प्रभाव नेमका काय असतो, हे आपल्याला सहज दिसून येईल.
Propagation- Diffusion effect