नाशिक

महेश्वर किल्ल्याच्या धर्तीवर काझीगढीला संरक्षक भिंत

नगरसेविका अदिती पांडेंचा पुढाकार : 76 कोटींचा प्रस्ताव

नाशिक : प्रतिनिधी
मागील कित्येक वर्षांपासून जुन्या नाशकातील काझीगढी भिंतीचा प्रश्न जैसे थे आहे. परिणामी पावसाळ्यात भीतीच्या सावटाखाली येथील नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागते. दरम्यान, काझीगढीला महेश्वर किल्ल्याच्या धर्तीवर संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव प्रभाग 13 च्या भाजप नगरसेविका अदिती पांडे, नगरसेवक राहुल शेलार यांनी दिला आहे. त्यांच्या पुढाकारातून या धोकादायक भिंतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी सुमारे 76 कोटींची मागणी दोन्ही लोकप्रतिनिधींनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या भिंतीचे आकर्षक बांधकाम होणार असल्याने सिंहस्थात येणार्‍या भाविकांना ते भावणार आहे.
दरम्यान, यापूर्वीही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या प्रकल्पाचा विस्तार करत अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले.त्यानुसार आता 76 कोटींचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पाची व्याप्ती वाढून अधिक मजबूत आणि दीर्घकालीन उपाययोजना शक्य होणार असल्याचे मानले जात आहे.
जुने नाशिक परिसरातील गोदावरी नदीकाठावरील काझीगढी परिसराचे संरक्षण, संवर्धन आणि सौंदर्यवर्धन करण्यासाठी गोदावरी नदीच्या पुरामुळे व काठाच्या होणार्‍या धूपमुळे काझीगढी परिसराला वारंवार धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर संरक्षक भिंत उभारल्यास पूरप्रसंगी होणारे नुकसान टाळणे, ऐतिहासिक वास्तूंंचे जतन करणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे शक्य होणार आहे. यासोबतच नदीकाठाचे सुशोभीकरण, पदपथ, बसण्याची व्यवस्था आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या संदर्भात ना. महाजन यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांनी हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दोन्ही नगरसेवकांनी दिली. टप्प्याटप्प्याने काम केल्यास निधी उपलब्धता आणि अंमलबजावणी सुलभ होणार आहे.

या बांधकामामुळे जुने नाशिकच्या ऐतिहासिक ओळखीला नवसंजीवनी मिळणार आहे. विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे काम झाल्यास आणखी उत्तम होणार आहे. या प्रकल्पामुळे संरक्षणासह पर्यटनाचा नवा आयाम मिळेल. – अदिती पांडे, नगरसेविका, प्रभाग 13

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

16 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

16 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

16 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

16 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

16 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

16 hours ago