नाशिक

पेस्ट कंट्रोलवरील सहा वर्षांचा हिशेब द्या

महापौरांचे निर्देश; नगरसेवकांकडून ठेका रद्दची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका पेस्ट कंट्रोल (धूरफवारणी)चे काम ठेकेदाराच्या माध्यमातून करते. मात्र, संबंधित ठेकेदार दर्जाहीन, निकृष्ट काम करत आहेत. याद्वारे महापालिका प्रशासनाची केवळ आर्थिक लूट केली जात आहे. या धूर फवारणीद्वारे डासांवर कुठलाही परिणाम होत नसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. याप्रकरणी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मलेरिया विभागाला सहा वर्षांत पेस्ट कंट्रोल ठेक्यावर झालेला खर्च सभागृहात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक महापालिकेची महासभा विविध कारणांनी वादळी ठरली. यात पेस्ट कंट्रोलच्या कामाचाही समावेश आहे. नगरसेविका किरण गामणे, दिनकर पाटील, भूषण राणे, भारती ताजनपुरे, समाधान देवरे, सीमा पवार आदींसह इतर सदस्यांनी पेस्ट कंट्रोलकडून सुरू असलेल्या दर्जाहीन कामावर आक्षेप घेतला. सदर ठेकेदार धूरफवारणी करताना त्यात कुठलेही औषध न वापरता फक्त धूरफवारणी करत आहे. या निकृष्ट कामामुळे डासांवर शहरात कुठल्याही प्रभागात प्रतिबंध घातला जात नाही. हा प्रकार गंभीर असून, याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही त्यावर प्रशासन कुठलीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. पेस्ट कंट्रोलचे काम ठेकेदाराच्या पथ्यावर कसे पडेल, याकरिता महापालिकेचेच काही अधिकारी त्यासाठी प्रयत्न करत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
दोन-दोन विभाग मिळून असे एकूण तीन ठेके मलेरिया विभागाने विभागून पेस्ट कंट्रोलचे काम दिले आहे; परंतु यात ठेकेदाराचे हित जोपासून त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

…तर महापालिका स्वत: बघणार काम
पेस्ट कंट्रोलसाठी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, याची माहिती घेऊन ती सभागृहात मांडावी. महापालिकेला शक्य असल्यास हे काम स्वत: महापालिका करेल, असे आश्वासन महापौर आडके यांनी दिले. काही सदस्यांनी पेस्ट कंट्रोलचा ठेका रद्द करून आमच्याकडील कार्यकर्ते स्वत: ते काम करतील, अशी मागणी केली.

श्वेतपत्रिका सादर
मार्च महिन्यात नगरसेवकांनी प्रशासकीय राजवटीच्या काळातील श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी महासभेत केले होती. त्यानुसार मंगळवारच्या महासभेत प्रशासनाने चार वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला.

 

Provide the accounts for pest control for the last six years.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago