नाशिक

पाऊस लांबल्याने खत वापराला ब्रेक

खरिपासाठी मंजूरपैकी 35 टक्के खतेच जिल्ह्यात दाखल

नाशिक : प्रतिनिधी
यंदा मान्सूनचे आगमन होऊनही नाशिक जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यातच अल निनोच्या सावटामुळे पावसाबाबत अनिश्चितता कायम असल्याने अनेक शेतकर्‍यांनी पेरणी व खतांचा वापर पुढे ढकलला आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी जूनअखेर मंजूर करण्यात आलेल्या 97 हजार 847 टन खतापैकी केवळ 34 हजार 516 टन (35 टक्के) खताचा प्रत्यक्ष पुरवठा झाला आहे. 63 हजार 331 टन खताचा पुरवठा अद्याप बाकी आहे. सध्या जिल्ह्यात एक लाख 53 हजार 484 टन खतसाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या 25 जूनच्या अहवालातून समोर आली आहे.
खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्याची एकूण खत मागणी दोन लाख 53 हजार टन असून, शासनाने दोन लाख 22 हजार टन खत मंजूर केले आहे. त्यांपैकी जूनअखेर 97 हजार 847 टन खत मंजूर करण्यात आले असून 34 हजार 516 टन खत जिल्ह्यात दाखल झाले आहे. उर्वरित 63 हजार 331 टन खताचा पुरवठा होणे अद्याप बाकी आहे.
खतप्रकारनिहाय युरियाचे 17 हजार 553 टन, डीएपीचे दोन हजार 105 टन, एमओपीचे 252 टन, एसएसपीचे दोन हजार 871 मेट्रिक टन आणि एनपीके कॉम्प्लेक्सचे 11 हजार 735 मेट्रिक टन खत जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात उपलब्ध एकूण साठ्यात युरियाचा 42 हजार 153 मेट्रिक टन, डीएपीचा 13 हजार 398 मेट्रिक टन, एमओपीचा 886 मेट्रिक टन, एसएसपीचा 17 हजार 437 मे. टन आणि एनपीके कॉम्प्लेक्सचा 79 हजार 610
मेट्रिक टन साठा आहे.
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 53 हजार 164 मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. विक्रेत्यांकडे 93 हजार 226 मेट्रिक टन प्रत्यक्ष खतसाठा उपलब्ध आहे.

खरीप हंगाम 202627 साठी नाशिक जिल्ह्याला 2.22 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकर्‍यांना वेळेत व अखंडित खतपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. युरिया (8,500 मेट्रिक टन) व डीएपी (1,100 मेट्रिक टन) या खतांचा संरक्षित साठा तालुकानिहाय उपलब्ध असल्याने कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही. ई-पॉस प्रणालीद्वारे पारदर्शक वितरण, साठेबाजी व काळाबाजाराविरोधात भरारी पथकांची कारवाई सुरू आहे. शेतकर्‍यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करून पक्के बिल घ्यावे.
– वरुण पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि. प. नाशिक

 

Fertilizer application halted due to delayed rains.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago