नाशिक

पाऊस थांबल्याने द्राक्षवेलींच्या छाटणीस गती

सतत पावसामुळे परिपक्वतेत अडचण; द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

निफाड : विशेष प्रतिनिधी
नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात कायमच अग्रेसर मानला जातो. यंदा मे महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने निफाडच्या द्राक्षपंढरीत द्राक्षवेलींची ऑक्टोबर छाटणी उशिराने होत आहे. पावसाने उसंत देताच द्राक्ष उत्पादक बाग छाटणीकडे वळाले आहेत. अनेक द्राक्ष उत्पादकांनी टोमॅटोचीही लागवड केली होती. त्यात अनेक शेतकर्‍यांचे टोमॅटो प्लॉट सपंत आल्याने ते शेतकरी आता द्राक्षवेलींच्या छाटणीकडे वळाले आहेत.
यंदा मे महिन्यापासून सततच्या पावसामुळे द्राक्षबागेतील वेलींना पुरेसा प्रमाणात सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे द्राक्षवेलीवरील काडी पुरेशा प्रमाणात परिपक्व झालेली नाही. त्यामुळे गर्भधारणेला अडचण होण्याची शक्यता आहे. द्राक्षबागायतदारांना यंदा द्राक्षवेलींवर माल येणार की नाही? याबाबत शाश्वती राहिलेली नाही. विशेष म्हणजे, एप्रिल छाटणी झाल्यानंतर मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच वादळीवार्‍यासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे द्राक्षबागांना अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे सतत पडणार्‍या पावसामुळे काडी परिपक्वतेला अडचण निर्माण झाली. त्यात उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागांमध्ये द्राक्षवेलींवरील काडी हिरवीच राहिल्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाही, असे काही तज्ज्ञांचे
मत आहे.
सन 2024 ला अर्ली द्राक्षबागा एप्रिलच्या आधी लवकर छाटणी झालेल्या आहेत. त्या बागांना बर्‍यापैकी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे अशा बागांमध्ये काडी परिपक्व होऊन अपेक्षित घडनिर्मिती झालेली दिसून येत आहे. मात्र, सध्या पडत असलेल्या पावसामुळे काही द्राक्षबागा पोंगा अवस्थेत असल्यामुळे अशा बागांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भावाची शक्यता आहे. सतत पावसामुळे द्राक्ष फवारणीला अडचणी निर्माण होत असून, बागेत चिखल असल्यामुळे फवारणी यंत्र चालत नसल्यामुळे फवारणीला विलंब होत आहे. अनेक द्राक्षबागांमध्ये अजूनही पाणी वाहत असल्यामुळे छाटणीला विलंब होताना दिसत आहे.
त्याचप्रमाणे द्राक्षबागा छाटणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण होत आहे. तालुक्यात मजुरांची संख्या कमी असल्यामुळे पेठ, सुरगाणा, हरसूल परिसरातून मजूर आणले जातात व त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात. अनेक द्राक्ष उत्पादक आपली द्राक्षवेली उशिरा छाटण्याची शक्यता आहे. कारण द्राक्षवेलीला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला नसल्यामुळे छाटणी उशिरा घेणार असल्याचे बागायतदारांकडून बोलले जात आहे. त्याचप्रमाणे काही द्राक्षवेलींवर सध्या पाने शिल्लक नसल्यामुळे अशा द्राक्षवेलींवर कवळ्या फुटी निघत असल्यामुळे अशा द्राक्षबागा छाटणीशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक द्विधा मन:स्थितीत आहे, तरी काही शेतकरी द्राक्षवेली छाटणीचे धाडस करत आहेत.

निसर्गाशी सामना करण्याची तयारी ठेवून द्राक्षवेलींच्या ऑक्टोबर छाटणीचा श्रीगणेशा केला आहे. जवळपास 35 हजार रुपये व एक पोते धान्य याप्रमाणे एकरी द्राक्षबागेचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे, त्यात मजुरांनी द्राक्षवेलींची छाटणी करणे, काडीला पेस्ट लावणे, फेल काढणे, द्राक्षघडांची दोनदा डिपिंग करणे, घड विरळणी करणे अशा कामांचा समावेश आहे.
– वामनराव बोरगुडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, नैताळे

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago