– अशोक थोरात
समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. किराणा, कापड, हॉटेलसह अनेक व्यवसायांत उधारीने घेऊन परत न करण्याची लबाडांची टोळी सर्वत्र दिसते. अगदी डॉक्टर, मेडिकल, दुधवाला यांचेसुद्धा पैसे बुडवणारे वाढत आहेत. हा चिंतेचा विषय झाला आहे. दुसरी बाजू, अत्यंत अडचणीच्या काळात प्रगतीसाठी शेतीत उत्पन्न वाढविण्यासाठी पोल्टी, ट्रॅक्टर घेणारे बँकेची जप्ती टाळण्यासाठी, मुलगा, पत्नी, भाऊ खूप आजारी आहेत अशावेळी उसनवार घेतलेले पैसे थेट बुडवणारे सर्वत्र आढळतात. तुम्हाला मोठे कर्ज मिळवून देतो, मोठी सबसिडी मिळेल. फक्त प्रथम दोन-तीन हजार रुपये द्या, असे करून गरीब-कष्टकरी महिलांचे पैसे ढापणारे कमी नाहीत.
नोकरी लावून देतो पैसे द्या, बिचारा मुलाच्या भविष्यासाठी मोठी रक्कम देतो. नोकरी दूरच पैसे मागू नये म्हणून संबंधितांचा मोबाइल नंबरच ब्लॉक केला जातो. वारंवार नंबर, घरचे पत्ते बदलले जातात. बरे आता या प्रवृत्तीमुळे उसनवार मदत करणारा आता धनादेश, नोटरी करून घेतो. हे केल्यावर एक वर्ग आजही प्रामाणिक आहे. दिले आहेत, खोटे मागतो या थराला जाणारेपण कमी नाहीत. मग कोर्टात जावे, खर्च करावा, तारीख पे तारीख सहन करावी. एक बरे आहे, चेक देणारे सुटत नाहीत. हे प्रमाण 90 टक्के आहे. स्व. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी उसनवारीचे पैसे बुडवणार्यांना छान बळ दिले होते. म्हणजे कुणी मरत असेल मरू द्यावे, पण मदत करू नये, हे सर्वत्र बोलले जाते. शेवटी प्रत्येेकाचा रुपया कष्टाचा व घामाचा असतो, याची आठवण ठेवली पाहिजे. अशांना गुरू खूप मिळतात. पण झटक्यानंतर गुरू फरार होतो. समाज भरकटत आहे. समाजात शिस्त संपत चाललेली आहे. फक्त पैसा पैसाच जमा करणारे पुढारी 80 टक्के, तर फक्त पैसा पैसा करीत नोकरी करणारे 80 टक्के. 20 टक्के बिचारे हतबल झाले आहेत. जळगावात करोडोंची वरकमाई करून दहा हजारांसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जेलमध्ये टाकतो. महानगरपालिकेचे दोन दिवसांत निवृत्त होणारे आयुक्तपण जेलवारीत जातात. समाजाने कुणाचा आदर्श घ्यावा, हा प्रश्न तयार झाला आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांनी समजून घ्यावे
राष्ट्रीयीकृत बँका मोठा विनोद करतात. प्रत्येक राज्यातील कर्मचारी त्या- त्या राज्यातच का राहू देत नाहीत? कर्मचार्यांची देशभरात कोठेही बदली करतात. साहजिकच आहे. या कर्मचार्यांची गैरसोय होते. मूड लागत नाही. ते टाइमपास करतात. दुसरी समस्या म्हणजे, भाषेची येते. ते हिंदी कशीतरी बोलतात. अनेक राज्यांत स्थानिक भाषाच जनतेला समजते. यात बर्याच वेळा चकमकी होतात. बँकांनी असे न करता राज्यातच कोठेही बदली करायला हरकत नाही. म्हणजे कर्मचारी समाधानी, ग्राहक समाधानी. भाषेमुळे ध चा मा लगेच होतो. एका बँकेत सोने तारण ठेवल्यानंतर वर्षानंतर थकबाकीदार होतो. बरेच लोक कसेतरी पैसे भरून नवीन कर्ज घेतात व थकबाकीचा भुर्दंड टाळतात. आता एका बँकेने वर्ष नाही, तर नऊ महिन्यांतच पैसे भरा, असे फर्मान काढले. त्यामुळे अचानक पैसे कसे भरायचे या समस्थेत अनेक जण अडकले आहेत. दुष्काळ व बँकांनी कर्ज घेताना कोणतीच सूचना न देता जनतेची दिशाभूल करून मनस्ताप सुरू केला आहे. शासनाने बँकांना वर्षभरात पैसे फेडण्याची सूचना करावी. नंतरच थकबाकीदार करावे, अशी जनतेची मागणी आहे.
Punishment for helping!
- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…
- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…
- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…
नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…
मोठे नुकसान, अग्निशामककडून आग आटोक्यात सिडको : प्रतिनिधी जुने सिडको परिसरातील बडदेनगर येथे रविवारी (दि.…