वाहनधारकांसाठी प्रवास बनला जीवघेणा
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील मोहगाव-कोटमगाव या दोन्ही गावांना जोडणार्या दारणा नदीवरील पुलाचे संरक्षणात्मक रेलिंग तुटल्याने या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालक व पादचार्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंचे रेलिंग तुटून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दिवसा तर चालणे कठीण असून, जीवमुठीत धरून चालावे लागते. रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तातडीने या दोन गावांना जोडणार्या पुलाची दुरुस्ती करा; अन्यथा संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
मोहगाव-कोटमगाव या दोन गावांसह परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. रेलिंग तुटल्यामुळे वाहनांचा तोल गेल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची तातडीने पाहणी करून तुटलेले रेलिंग दुरुस्त करावे, तसेच आवश्यक ते सुरक्षा उपाय त्वरित राबवावेत, अशी मागणी केली आहे. तातडीने पुलाचे रेलिंग बसवावेत, अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा योगेश टिळे, विशाल टिळे, शांताराम टिळे, नवनाथ टिळे, रोहिदास टिळे आदींसह नागरिकांनी दिला आहे.
Railing of the bridge on the Mohgaon-Kotamgaon road uprooted.
- ज्योती काळे- जाधव तरुणाईच्या डोळ्यांत स्वप्नं, मनात नवी उमेद आहे, तरी तिच्याच भविष्याभोवती आज…
- सीमाताई मराठे देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली…
- समाधान कदम भारत-जपान भागीदारीला मैत्रीचा आधार जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाईची यांनी 1 जुलै ते…
- राजेश शिरभाते न्यूटनचा नियम आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक क्रियेला त्यापेक्षाही जोरदार अशी प्रतिक्रिया…
दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा नाशिक : प्रतिनिधी दुष्काळाचे सावट दूर होऊन…
न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान उच्चारला गेलेला ‘झुरळ’ हा शब्द, सोशल मीडियावर तयार झालेली कॉक्रोच जनता पार्टी,…