पिंपळनेर प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील बहुचर्चित बलात्कार व फरार आरोपी प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. या प्रकरणातील बलात्कार पीडित युवतीच्या आत्महत्येनंतर फरारी असलेल्या संशयित आरोपीनेही त्यांच्या स्वतःच्या विहिरीत आत्महत्या केल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथील पीडित युवतीने दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये उमेश बंडू खांदवे याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दिंडोरी पोलिसांनी उमेश बंडू खांदवे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीला 30 सप्टेंबर पर्यंत शिक्षा दिली होती. परंतु उमेश बंडू खांदवे हा आरोपी पोलिसाना चकमा देऊन फरार झाला होता. त्यानंतर बलात्कार पीडित युवतीने विहिरीत आत्महत्या केली होती. त्यानंतर फरारी आरोपी उमेश खांदवे याने पण त्यांच्या स्वतःच्या विहिरीत आत्महत्या केल्याने पिंपळणारे गावाबरोबर दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…