रेमंड उद्योग समूहाचे संस्थापक  विजयपत सिंघानिया यांचे निधन

रेमंड उद्योग समूहाचे संस्थापक

विजयपत सिंघानिया यांचे निधन
मुंबई:
भारताच्या कॉर्पोरेट जगतातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व, पद्मभूषण एअर कमोडोर (डॉ.) विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचे काल निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र, गौतम सिंघानिया यांनी ट्विटरवर ही बातमी दिली. रेमंड ग्रुपच्या माजी अध्यक्षांच्या निधनाच्या बातमीनं उद्योगक्षेत्रात धक्का बसला आहे. ‘द कम्प्लीट मॅन’ म्हणून रेमंडला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
भारत सरकारने त्यांना पद्धमभूषण पुरस्काराने गौरविले होते. . 1938 मध्ये जन्मलेले विजयपत सिंघनिया यांनी रेमंड उद्योग समूहाची उभारणी केली होती. 1980 ते 2015 या कालावधीत त्यांनी या समूहाचे चेअरमन पद भूषवले. त्यांनी लंडन विद्यापीठ ची मानद पीएचडी पदवी प्राप्त केली होती. 2006 मध्ये त्यांना पद्धमभूषण पुरस्काराने गौरविले होते. जगातील सर्वांत उंच एअर बलून ने उड्डाण करण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता. सिन्नर एमआयडीसी मध्ये या विक्रमा बद्दल आमदार माणिकराव कोकाटे यांनी सत्कार करण्यात देखील केला होता. सिंघनिया यांनी केलेल्या विक्रम बद्दल पुस्तकही लिहिले होते.

आज होणार अंत्यसंस्कार

:रेमंड ग्रुपचे प्रवक्ते आणि कुटुंबीयांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, विजयपत सिंघानिया यांच्यावर   रविवार 29 मार्च 2026 रोजीअंत्यसंस्कार  होणार आहेत.  दुपारी 3:00 वाजता चंदनवाडी इथं त्यांच्यावर अंतिम संस्कार (दहनभूमी) केले जातील.

सिंघानिया यांची साहसी कृत्यांसाठीही ओळख : विजयपत सिंघानिया यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम होते. 1988 मध्ये, त्यांनी यूके ते भारत असा मायक्रोलाइट विमानाचा एकट्यानं उड्डाण करुन इतिहास रचला. 2005 मध्ये, त्यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला,  मुंबईचे शेरीफ म्हणूनही काम केलं होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

16 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

16 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

16 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

16 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

16 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

17 hours ago