नाशिक

देवळा, डांगसौंदाणे मार्केटमध्ये कांद्याला उच्चांकी भाव

नाशिक : विशेष प्रतिनिधी
शासनाने वाढवलेला कांद्याचा खरेदी दर, बाजारात घटलेली उन्हाळ कांद्याची आवक आणि दक्षिण भारतातील नवीन खरीप कांदा बाजारात दाखल होण्यास लागणारा वेळ, या त्रिसूत्रीमुळे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत आहे.
देवळा येथील सुनील आहेर मार्केट तसेच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डांगसौंदाणे उपबाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल 4,500 ते 4,545 रुपये या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये साठवलेला रब्बी (उन्हाळ) कांदा ऑक्टोबरपर्यंत देशाची गरज भागवतो. सध्या चाळींमधील साठा कमी होत असल्याने बाजारात आवक मंदावली आहे. तसेच सर्वसामान्य शेतकर्‍यांकडे कांदा राहिलेला नाही. काढणीच्या वेळी अवकाळी पावसामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी झाली होती. केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या बफर स्टॉक खरेदी दरात वेळोवेळी वाढ केल्याने खुल्या बाजारातील दरांनाही थेट आधार मिळाला आहे. कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील सुरुवातीचे खरीप पीक बाजारात येण्यास विलंब होत आहे. डांगसौंदाणे व देवळा येथील व्यापार्‍यांकडून मिळणार्‍या चांगल्या दरांमुळे बागलाण व कळवण पट्ट्यातील शेतकरी आपला माल येथे आणत आहेत. कांद्याच्या या तेजीचा पुढील टप्पा पूर्णपणे सप्टेंबर महिन्यातील हवामानावर आणि पिकांच्या स्थितीवर अवलंबून असेल. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नवीन खरीप पिकाचे नुकसान झाल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होऊन किमतींवर अधिक दबाव येईल. सप्टेंबरनंतर महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील मुख्य खरीप कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. चांगल्या प्रतीचा कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला तरच किमती नियंत्रणात राहू शकतील, असे जाणकारांनी सांगितले.

मंगळवारचा कांद्याचा बाजारभाव (प्रतिक्विंटल)
बाजार समिती      कमाल       किमान    सरासरी
लासलगाव            1000         3641       3360
विंचूर                    1000         3601       3300
पिंपळगाव            2000        3964        3450

Record-high prices for onions in Deola and Dangsaundane markets.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

14 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

14 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

15 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

15 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

15 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

16 hours ago