राज्यभरातील शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप
मुंबई :
मुंबईमध्ये मंगळवारी (दि. 17) रात्री धक्कादायक प्रकार घडला. स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वर्गीय मीनाताई ठाकरे या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत हा प्रकार झाल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दादर येथील शिवाजी पार्क येथे स्व. मीनाताई ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्यांच्या या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.16) रात्री हा प्रयत्न करण्यात आला असून, यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या संतापजनक प्रकारानंतर ठाकरे गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, घडलेल्या या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
उद्धव, राज ठाकरे घटनास्थळी भेट
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून, हा प्रकार करून महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो, असे म्हटले.
यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत.
रंग टाकणार्याला अटक; आरोपीची कबुली
पुतळ्यावर लाल रंग टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा ठाकरे यांच्या कार्यकर्त्याचा चुलतभाऊ असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून, गुन्हा केल्याचे त्याने कबूल केल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आरोपीने केला आहे. दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, अशी सूत्रांची माहिती आहे. आता आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…