नाशिक

मोकाट जनावरांच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

इंदिरानगर भागात मोकाट जनावरांची गंभीर समस्या

इंदिरानगर : वार्ताहर
इंदिरानगर भागात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गाय आडवी गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरात वडाळा-पाथर्डी हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर कलानगर चौक, रथचक्र चौक, श्रेजयनगर भागात मोकाट जनावरे फिरत असतात. दुपारच्या वेळी ही जनावरे रस्त्यावरच बसतात, आडवी पडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय, अपघात होण्याचीदेखील शक्यता आहे. या रस्त्याने नेहमी शाळकरी मुले ये-जा करतात. ही जनावरे मारतील की काय, अशी भीती पायी जाणार्‍या शाळकरी मुलांमध्ये आहे. त्यामुळे जनावरे दिसताच मुले घाबरून पळतात. मोकाट जनावरांच्या वावरण्यामुळे अपघात होत आहेत.
अरुणा शशिकांत सोनगीर सोमवारी (दि. 15) सायंकाळी आपल्या पतीसमवेत मोटारसायकलवर डबल सीट जात होत्या. सम्राट स्वीटकडे जाताना इंदिरानगरमधील चर्चजवळ अचानक गाय आडवी गेल्याने दोघे दुचाकीवरून पडले. या घटनेत अरुणा सोनगीर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लेखानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यापूर्वीदेखील मागणी करून प्रशासनाने या जनावरांचा प्रश्न मार्गी लावला नव्हता. यातील बरीच जनावरे पाळलेली आहेत. जनावरांच्या पोषणाचा खर्च वाचवा, यासाठी ही जनावरे दिवसभर सोडली जातात. मालक दिवसभर या जनावरांना बाहेर सोडतात व रात्र झाली की घरी नेऊन बांधतात. त्यामुळे या मोकाट जनावरांना कोंडवड्यात टाकावे किंवा मालकांना तंबी द्यावी, अशी मागणी होत आहे.

इंदिरानगर भागात नेहमीच मोकाट जनावरे फिरत असतात. आमच्यासारख्या ज्येष्ठांना तसेच इतरांना जा-ये करताना भीती वाटते. मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यापूर्वीदेखील केलेली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तरी प्रशासनाने जागे होऊन हा प्रश्न मार्गी लावावा.
-बापूसाहेब गायधनी, ज्येष्ठ नागरिक

Editorial Team

Recent Posts

लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

‘जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक’ चर्चेविना मंजूर नवी दिल्ली : प्रतिनिधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 10 व्या…

3 minutes ago

भिवंडीत इमारत कोसळून 10 ठार

भिवंडी/शहापूर : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे बालाजीनगर भागातील कोहिनूर ही चार मजली इमारत कोसळल्याची…

7 minutes ago

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

21 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

21 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

21 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

22 hours ago