उत्तर महाराष्ट्र

अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांचे नातेवाईक चिंताग्रस्त

नाशिक :अश्विनी पांडे

शुक्रवारी सायंकाळी अमरनाथ गुफेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना झाली. अमरनाथ यात्रेसाठी   देशभरातील भाविक गेले आहेत. नाशिकहून अनेक भाविक यात्रेसाठी गेले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेची माहिती समोर येताच यात्रेला गेलेल्या यात्रेकरूनचे नातेवाईक, मित्रमंडळी चिंताग्रस्त झाले आहेत.   दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून  हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ज्याच्याशी   थेट मोबाईलवरून  संपर्क होऊ शकत नाही अशा भाविकांचे नातेवाईक  हेल्पलाईनवर संपर्क करत आपल्या आप्तेष्टांची खुशाली जाणून घेत आहेत. नाशिक शहरातून शंभराहून अधिक भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. त्यात काही ट्रॅव्हल्स कंपनीच्यावतीने  तर काही भाविक स्वतःच यात्रेसाठी गेलेले आहेत.  यात्रेसाठी गेलेल्या भाविकांपैकी सुमारे 70 ते 80 भाविक ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्याच्या मागील बाजूस अडकले होते.  तर 50 ते 60 भाविक दर्शनानंतर पुढे आले होते. ते सुखरूप आहेत. नाशिक शहरातून 100 हून अधिक भाविक आठ दिवसापूर्वी अमरनाथ यात्रेला गेले होते. तर सोमवारी जम्मु तावी ला  पोहचल्यानंतर बुधवारपासून टेकडी चढण्यास सुरूवात केली. डोंगरावर जात असताना चांगले वातावरण होते पण दर्शन झाल्यानंतर खाली येत असताना  अचानक ढग फुटी झाली आणि  भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर चिंतेचे ढग उभे राहिले.  शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर नातेवाईकांकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अनेकांचे सुखरूप असल्याचे निरोप आले असले  नातेवाईक मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.  तर जे भाविक ट्रॅव्हल्सकंपनीच्यावतीने न जाता स्वत गेले आहेत असे किती नाशिककर भाविक आहेत याची माहिती अद्याप नाही.

Bhagwat Udavant

Recent Posts

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

  काँग्रेस  मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…

2 hours ago

अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…

3 hours ago

नाशकातील शिवसैनिक जागेवरच : खा.संजय राऊत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…

3 hours ago

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…

3 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…

3 hours ago

अंबडमधील चोरी उघडकीस; युनिट दोनची कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपुर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जनावरांच्या चोरीचा गुन्हा…

3 hours ago