उत्तर महाराष्ट्र

प्लास्टिक वापरणार्‍यांना आठवड्यात साठ हजारांचा दंड

 

नाशिक :गोरख काळे

शासनाने सिंगल यूज प्लास्टिक आणि 150 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी घातली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या विक्री-खरेदीत गुंतलेल्या व्यापार्‍यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यानुसार गत आठवडयात पालिकेने साठ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.
नाशिक महापालिकेने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, विक्री आणि वापर करणार्‍यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने 1 ते 7 जुलै दरम्यान सहा विभागात कारवाई करण्यात येऊन 60 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसर्‍यांदा पकडले गेल्यास अनुक्रमे 5,000 आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तिसर्‍यांदा बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री-खरेदी करताना पकडलेल्या व्यापार्‍यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. चुकीचे व्यापारी चौथ्यांदा पकडले गेल्यास त्यांच्याविरुद्ध महापालिका पोलिसात गुन्हे दाखल करणार आहे. घनकचरा विभागाच्यावतीने पंचवटीत दोघांवर कारवाई करीत 10000 रू. सातपूर 5000रू. सिडको 15000 रु. नाशिकरोड 20000 रु. नाशिक पश्चिम 5000 रु. नाशिक पुर्व 5000 रु याप्रमाणे एकूण 11 जणांवर कारवाई करून 60 हजार रूपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago