जिल्ह्यात दोन हजार 792 रुग्णांना मिळाली मदत
नाशिक : प्रतिनिधी
गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेतून नाशिक जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत दोन हजार 792 रुग्णांना 23.51 कोटींची आर्थिक मदत देण्यात आली. जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येते.
ही योजना अशा रुग्णांसाठी महत्त्वाची ठरते, ज्यांना विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळू शकत नाही. अशा पात्र रुग्णांना वैद्यकीय समितीच्या पडताळणीनंतर आर्थिक सहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जात असून, आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणार्या रुग्णांसाठी ती मोठा दिलासा ठरत आहे. वेळेवर मदत मिळाल्यामुळे अनेकांना नवजीवन लाभत आहे.
आवश्यक कागदपत्रे
उत्पन्न दाखला (चालू वर्षाचा)
आधारकार्ड, रेशनकार्ड
रुग्ण संमतीपत्र
अपघात प्रकरणात गुन्हा/नोंद
अवयव प्रत्यारोपणासाठी शासकीय परवानगी
जिल्ह्यातील विशेष उपक्रम
43 आरोग्य शिबिरे- 25,758 नागरिकांची तपासणी
चरणसेवा- 4,236 वारकर्यांना सेवा
1,098 शिबिरे- 45,872 नागरिकांची तपासणी
56,881 लाभार्थ्यांची नेत्रतपासणी
अपघातग्रस्त व बालकांना तातडीची मदत
कोणाला मिळतो लाभ?
उत्पन्न 1.60 लाखांपेक्षा कमी असलेले रुग्ण.
शासकीय योजनांचा लाभ न मिळणारे रुग्ण.
नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणारे नागरिक.
या आजारांसाठी मदत?
कर्करोग, हृदयरोग, मेंदुविकार
अवयव प्रत्यारोपण
नवजात व बालकांचे आजार
डायलेसिस, अपघात व जळीत रुग्ण.
कॉक्लिअर इम्प्लांट.
Relief for patients from Chief Minister’s Relief Fund
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…