नाशिक

दिवसाच्या वीजवापरात 70 लाख ग्राहकांना 2,235 कोटींचा लाभ

नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील वीजग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी सवलत जुलै 2025 मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत 70 लाख ग्राहकांना एकूण 2,235 कोटींचा लाभ झाला आहे. त्यात 15,907 उच्चदाब औद्योगिक
ग्राहक एकूण 1,534 कोटींच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
विजेचा वापर कोणत्या वेळेत झाला त्याच्या आधारे वीजदरात सवलत दिली जाते, त्याला टीओडी सवलत म्हणतात. राज्यात जुलै 2025 पासून दहा किलोवॉटपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक व वाणिज्यिक वीजग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीजवापरासाठी सवलत देण्यात आली. या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांसाठी 15 टक्के, तर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांसाठी 25 टक्के इतकी मोठी सवलत देण्यात येत आहे. सर्व घरगुती ग्राहकांनाही प्रथमच टीओडी सवलतीचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीजवापरासाठी प्रतियुनिट 85 पैसे सवलत देण्यात येते. स्मार्ट मीटरमध्ये कोणत्या वेळी किती वीजवापर झाला हे मोजण्याची सुविधा असल्याने स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना या सुविधेचा लाभ होत आहे. औद्योगिक ग्राहकांमध्ये उच्च दाब औद्योगिक ग्राहक, उच्चदाब हंगामी औद्योगिक ग्राहक, लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि यंत्रमाग असा एकत्रित विचार केला तर 43,911 औद्योगिक ग्राहकांना एकूण 1,774 कोटींंंचा लाभ झाला आहे. राज्यातील उच्चदाब व लघुदाब अशा 11,017 वाणिज्यिक ग्राहकांना एकूण 239 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.
घरगुती ग्राहकांना टीओडीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यापासून त्यांना 1,096 दशलक्ष युनिट इतक्या विजेसाठी 89 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. या कालावधीतील लाभधारक घरगुती ग्राहकांची संख्या 69,35,388 इतकी होती. राज्यात घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. त्यासोबत टीओडी लाभ मिळणार्‍या घरगुती वीज ग्राहकांची संख्याही वाढत आहे.
सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीजदरातील सवलतीचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा आणि अन्य सार्वजनिक सेवांसाठीही झाला आहे. या घटकांसाठी संबंधित 12,989 ग्राहकांना 202 कोटींंचा टीओडी लाभ झाला आहे. राज्यातील सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय उर्जेची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे.

70 lakh consumers benefit from Rs 2,235 crore in daily electricity consumption

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago